बहिणीशी ‘लफडं’ असल्याच्या कारणावरून 5 रूपयाच्या ब्लेडनं सपासप मारून ‘चिरफाड’, आरोपींची ‘कबुली’

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बहिणीसोबत सुरु असलेल्या प्रेम प्रकरणाच्या रागातून अल्पवयीन भावाने बहिणीच्या प्रियकराची निर्घृण हत्या केल्याची घटना बीड जिल्ह्यातील परळी शहरात घडली आहे. अनिल हालगे (वय -22) असे मृत तरुणाचे नाव असून तो परळी शहरातील गणेशपार भागात राहत होता. या खूनप्रकरणी परळी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोन्ही अल्पवयीन आरोपीला अटक केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, परळी पोलीस ठाण्याला लागूनच असलेल्या कब्रस्तानमध्ये एक मृतदेह आढळून आला. पोलीस तपासात या युवकाच्या शरीरावर वार केल्याच्या खुना दिसून येत होत्या. या प्रकरणाचा अधिक तपास करून पोलिसांनी हत्येच्या पाच तासाच्या आत आरोपींना अटक केली. विशेष म्हणजे दोन्ही अल्पवयीन असून त्यांनी अनिलच्या शरीरावर ब्लेडने वार करून त्याचा खून केला. बहिणीसोबत सुरु असलेल्या प्रेम प्रकरणाच्या रागातून त्यांनी बहिणीच्या प्रियकराची हत्या केल्याची कबूली त्यांनी दिली.

आरोग्यविषयक वृत्त –