तासगावामधील तरुणाचा पूर्ववैमनस्यातून भोसकून खून

तासगाव : पोलीसनामा ऑनलाइन – सांगली येथील तासगाव मधील एका युवकाचा पूर्ववैमनस्यातून धारदार हत्यारांनी वार करून आणि भोसकून निर्घृण खून करण्यात आला आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळच्या दरम्यान घडली आहे. लवेश सुधाकर धोत्रे (वय २०, रा. तासगाव) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. तर अज्ञात ६ ते ७ हल्लेखोरांनी कृत्य केल्याचे समजते. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. तर संशयित हल्लेखोर पसार झाले आहेत.

अधिक माहितीनुसार, मागील काही महिन्यांपासून तरुणांच्या २ गटांत वारंवार वाद सुरू होता. तो वाद मिटवण्यासाठी महात्मा गांधी उद्यानासमोर दोन्ही गटांतील युवक शुक्रवारी सायंकाळी एकगट्टा झाले होते. त्यावेळी पुन्हा या तरुणांच्या गटात हाणामारी झाली. दुसर्‍या गटातील आधीच तयारीत असलेल्या तरुणांनी लवेश याच्यावर धारधार हत्याराने सपासप वार केले. लवेश अधिक लागल्याने रक्त वाहू लागले. आणि तो जागेवर पडला. त्यावेळी तेथे लोक जमा झाल्याने हल्लेखोराने पलायन केले. लवेशला तेथील रुग्णालयात दाखल केले असता तत्पूर्वी त्याचा मृत झाला होता.

दरम्यान, ग्रामीण रुग्णालयात लवेशच्या कुटूंबानी मोठी गर्दी केली होती. पोलिस आणि त्याचे नातेवाईक यांच्यात बराच वेळ वाद झाला. लोक आक्रमक होऊन पोलिसांशी हुज्जत घालत होते. यावेळी जमावाने पोलिस अधिकार्‍यांवर गंभीर आरोप केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तसेच, तासगाव उपविभागीय पोलिस अधिकारी अश्विनी शेंडगेसह पोलीस घटनास्थळी पाहणी केली. रात्री उशिरापर्यंत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते. संशयितांची नावे निष्पन्न झाली असून, लवकरच त्यांना अटक केले जाईल, असे पोलिसांनी सांगितले आहे.