जेजुरीत मेव्हुण्याच्या डोक्यात दांडके घालून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – जेजुरी येथील पालखी मैदानाजवळ स्वतःच्या लहान मुलीने मोबाईल खेळताना फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप बंद केल्याने मुलीला, पत्नीला आणि मेव्हण्याला मारहाण केली. या मारहाणीत डोक्यात दांडक्याने मारहाण केल्याने मेव्हुण्याचा मृत्यू झाला. या मारहाणी नंतर आरोपी पळून गेल्याचा धक्कादायक प्रकार जेजुरीत घडला आहे.

या मारहाणीत खून झालेल्या तरुणाचे नाव अर्जुन शेषराव शिंदे वय १९ रा.पाथरी, ता. परभणी असे आहे. तर आरोपी रवी भास्कर पवार रा.पाथरी. ता.परभणी हा पळून गेला आहे. या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रवी पवार हा त्याची बायको लक्ष्मी पवार, मुलगी शिवान्न्या, आई-वडील व इतर हे कुटुंब मुळगाव रा.पाथरी .ता.परभणी येथे राहतात.

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात हे सर्वजण फुगे विकण्याचे काम करतात. काही दिवसांपूर्वी हे कुटुंब जेजुरी येथील जुन्या पालखी मैदानाजवळ पालात रहात आहे. रवी पवार याला दारूचे व्यसन असून तो रोज दारू पिवून पत्नी लक्ष्मी हिला मारहाण करत होता. म्हणून लक्ष्मी यांनी स्वतःचा भाऊ अर्जुन शेषराव पवार याला जेजुरी येथे तीन दिवसांपूर्वी बोलावून घेतले होते.

आज दि २२ रोजी दुपारी तीनच्या सुमारास रवी पवार याच्या मुलीने रवी कडून मोबाईल घेवून खेळत होती. तिच्या कडून मोबाईल मधील फेसबुक आणि व्हाट्सअ‍ॅप बंद झाल्याने रवीने मुलगी शिवान्न्या हिला मारले म्हणून लक्ष्मी व तिचा भाऊ अर्जुन यांनी त्याला समजावून सांगत असताना रवीने त्याची पत्नी लक्ष्मी हिच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. यावेळी अर्जुन याने रवीला ढकलून दिले. पुन्हा रवी पवार याने स्वताचा मेव्हणा अर्जुन याच्या डोक्यात आणि छातीवर दांडक्यांनी मारहाण केली. अर्जुन खाली पडल्या नंतर रवी स्वताची दुचाकी घेवून पळून गेला.

लक्ष्मी पवार आणि त्यांच्या नातेवाईकांनी रिक्षा बोलावून अर्जुन यास ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता उपचारापूर्वीच अर्जुनचा मृत्यू झाला. रवी पवार याची पत्नी लक्ष्मी पवार हिने नवऱ्याविरुध्द जेजुरी पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दाखल केली. घटनेची खबर मिळताच जेजुरी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश माने आरोपीला पकडण्यासाठी पथके पाठविली आहेत. या खून प्रकरणी तसेच पत्नीला मारहाण प्रकरणी आरोपी रवी पवार याच्या विरोधात भा.द.वी.कलम ३०२, ३०७, ३२३, ५०४ या कलमांनुसार गुन्हा दाखल झाला आहे.

आरोग्यविषयक वृत्त