क्षुल्लक कारणावरून केला सख्ख्या भावाचा खून 

परभणी : पोलीसनामा ऑनलाईन – क्षुल्लक कौटुंबीक वादामधून सख्ख्या भावाचा खून केल्याची घटना सोनपेठ तालुक्यातील कानेगाव परिसरातील डोबाडी तांडा येथे घडली. मृताचे नाव नागनाथ सखाराम भोसले असे असून त्याची पत्नी व मुलगी देखील मारहाणीत गंभीर जखमी झाली आहेत. त्यांच्यावर अंबाजोगाई येथील शासकीय रूग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी तिघांवर सोनपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चक्क तहसिल कार्यालयात वाळूमाफियांच्या दोन गटात राडा

नागनाथ भोसले यांची वडिलोपार्जीत जमीन असलेल्या ठिकाण कंदुरीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी आपल्या जावयास का बोलावले या कारणावरून नायल भोसले याने त्याचा सख्खा भाऊ नागनाथ यास कुऱ्हाडीचे घाव घातले. पतीवर होत असलेला हल्ला लक्षात येताच नागनाथची पत्नी छाया आपल्या मुलीसह नवऱ्याला वाचविण्यासाठी धावली असता नायलच्या दोन्ही मुलांनी या दोघींनाही बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या तिघांना पुढील उपचारासाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर नागनाथ भोसले जागीच ठार झाला. सोनपेठ येथील शासकीय रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. मयताची पत्नी छाया नागनाथ भोसले हिने दिलेल्या फिर्यादीवरून नायल सखाराम भोसले, कन्हैया नायल भोसले, आकाश नायल भोसले यांच्या विरोधात सोनपेठ पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तिघांपैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

भरदुपारी घरफोडी, साडेसात लाखांचे दागिने लंपास


नापिकीमुळे शेतकऱ्याची आत्महत्या

नांदेड : सततच्या नापिकीला कंटाळून होनवडज (ता. मुखेड) येथील शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. नरसिंग विठ्ठलराव मारकवाड (५८) असे या शेतकऱ्याचे नाव आहे. नरसिंग मारकवाड यांच्या नावे होनवडज येथील शिवारात १. ७८ आर शेती आहे. उदरनिर्वाहासाठी ते शेतमजूरीही करत होते. सतत नापिकीमुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली असा परिवार आहे. तलाठी आणि पोलिस पाटील यांनी पंचनामा केला.