व्यावसायिकाचा गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून खून करणार्‍या दोघांना अटक

सासवड : पोलीसनामा ऑनलाईन – पूर्ववैमनस्यातून व्यवसायिकाचा कोयत्याने वार करून आणि गोळ्या झाडून खून केल्याची घटना २ मे २०१९ रोजी सकाळी पावणे अकराच्या सुमारास नारायपुर ते कोडीत रस्त्यावरील ओढ्याजवळ घडली होती. या प्रकरणी सासवड पोलीस ठाण्यात १४ जणांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने दोघांना अटक केली आहे.

हसर शेख असे खून करण्यात आलेल्या व्यवसायिकाचे नाव आहे. याप्रकरणी संकेत उर्फ संक्या प्रभाकर माताळे (वय-२१ रा. माताळवाडी. ता. हवेली), मयुर उर्फ दाद्या हरिभाऊ कडू (वय-२० रा. कोल्हेवाडी, ता. हवेली) असे अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी सोमनाथ शंकर पोकळे (वय-४२ रा. चांदणी चौक, धायरी) यांनी सासवड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत हसन शेख याचा बांधकाम आणि खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. तीन ते चार वर्षापूर्वी आरोपी आणि हसन यांच्यामध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद झाले होते. त्यावेळी हसन शेख याच्यावर हल्ला करण्यात आला होता. हसनने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपींना अटक करण्यात आली होती. याच रागातून आरोपींनी हसन शेखचा खून केला.

घटनेच्या दिवशी फिर्यादी आणि मयत हे नारायगाव येथे देव दर्शनासाठी गेले होते. त्यावेळी त्याच्या गाडीला पाठिमागून धडक देऊन त्यांना आडवण्यात आले. त्यावेळी दुचाकीवरून आलेल्या १४ जणांनी हसन याच्यावर हल्ला केला. हसन याच्यावर कोत्याने वार केले तसेच त्याच्यावर गोळ्या झाडून खून केला. खून केल्यानंतर आरोपी फरार झाले होते.

हि कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक धोंडगे, दिलीप जाधवर, पोलीस हवालदार चंद्रकात झेंडे, राजू शिनगारे, राजेंद्र चंदशीव, पोलीस शिपाई अमोल शेडगे, अक्षय नवले यांच्या पथकाने केली.

आरोग्यविषयक वृत्त