महाविद्यालयीन तरूणाचा ऐन दिवाळीत खून, संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ

अकोले : पोलीसनामा ऑनलाइन – अकोले शहरापासून जवळच असलेल्या गर्दणी गावच्या शिवारातील चिमणदरा येथे नवलेवाडी येथील १९ वर्षीय कॉलेज तरुणाचा खून करण्यात आला. प्रथमेश एकनाथ भोसले हे मयत युवकाचे नाव आहे.

याबाबत माहिती अशी कि, मूळ पिंपळगाव निपाणी येथील व सध्या नवलेवाडी येथे राहत असलेले आश्रमशाळेतील अधिक्षक एकनाथ भोसले यांचा मुलगा प्रथमेश हा १२ वीत शिक्षण घेत आहे. तो सीईटीच्या अभ्यासक्रमासाठी नांदेड राहत होता. दिवाली सुट्टीसाठी तो अकोलेतील नवलेवाडी येथे आला होता.

सगळीकडे दिवाली पाडवा साजरा होत असताना काल पाडव्याच्याच दिवशी काल (दि. २८) दुपारी प्रथमेश भोसले घरुन मिञास भेटण्यास गेले. त्यांचा मृतदेह गर्दणी शिवारात आढळून आला. प्रथमेश याच्या डोक्यात जबर मारहाण केल्याच्या जखमा आढळून आल्या आहेत. त्यामुळे त्याचा खून झाला असल्याची चर्चा सुरू आहे.

अकोले पोलीस ठाण्यात राञी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. आज मंगळवारी मृतदेहाचे शवविच्छेदन झाल्यानंतर अकोले पोलीस ठाण्यात अज्ञात इसमानवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते. संगमनेर चे उपविभाग पोलिस अधिकारी यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास पीएसआय दिपक ढोमणे करत आहे. या घटनेने अकोले तालुक्यात खळबळ उडाली आहे. प्रथमेशच्या मारेकऱ्यांचा तपास लावण्याचे सध्या पोलिसांना आव्हान आहे.

Visit : Policenama.com  

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like