म्हाळुंगेमध्ये सराईत गुन्हेगाराचा सपासप वार करून खून

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाईन – खून विना परवाना शस्त्र बाळगणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगारावर कोयत्याने वार करून खून करण्यात आला. हा प्रकार म्हाळुंगे येथे सोमवारी मध्यरात्री घडला आहे.

राजू राऊत (30, रा. म्हाळुंगे) याचा खून झाला आहे. राजू याच्यावर गंभीर गुन्हे दाखल असून तो म्हाळुंगे येथे राहत होता. यापूर्वी त्याची अनेकांशी भांडणे झाली आहेत. सोमवारी मध्यरात्री त्याच्यावर कोयत्याने वार केले आहेत. मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला.

मंगळवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. हिंजवडी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून मारेकरांचा शोध सुरू आहे.

Visit : Policenama.com  

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like