आईच्या विरोधानंतरही प्रेमसंबंध ठेवणं पडलं महागात, मुलीचा ओढणीनं गळा आवळून खून

मुंबई : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमसंबंधाला विरोध असतानाही प्रियकराबरोबर जाण्याची तयारी करीत असलेल्या स्वत:च्याच २३ वर्षाच्या मुलीचा ओढणीने गळा आवळून आईने खुन करण्याची घटना पायधुनी येथे घडली. मुलीची हत्या करुन तिने पोलीस ठाणे गाठले आणि ‘साहेब मीच मुलीची हत्या केली’ अशी कबुली आईने पोलिसांसमोर दिली. पोलिसांनी पाप्पू वाघेला (वय ४०, रा. पायधुनी) या आईला अटक केली आहे. निर्मला अशोक वाघेला (वय २३) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी सांगितले की, निर्मला हिचे गेल्या काही दिवसांपासून एका तरुणाबरोबर प्रेमसंबंध होते. या प्रेमसंबंधाला आईचा विरोध होता. त्याच्याबरोबर तिने संबंध ठेवू नये असे आईला वाटत असे. त्यावरुन त्यांच्यात अनेकदा भांडणेही झाली. वारंवार होणाऱ्या या भांडणाला कंटाळून निर्मला हिने त्याच्याबरोबर राहण्यास जाणार होती. तसे तिने आईला सांगितले. तेव्हा त्यांच्यात पुन्हा वाद झाला. निर्मला हिने घरातून निघून जाण्यासाठी बॅग भरण्यास सुरुवात केली.

ती बॅगेत कपडे भरत असताना रागाच्या भरात आईने मारुन तिच्याच गळ्यातील ओढणीने तिचा गळा आवळला. त्यात निर्मला हिचा मृत्यु झाला. त्यानंतर तिने स्वत:च पायधुनी पोलीस ठाणे गाठून मुलीची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन निर्मला हिला रुग्णालयात नेले. परंतु, तोपर्यंत तिचा मृत्यु झाला होता. पोलिसांनी आईला अटक केली आहे.

Visit :  Policenama.com 

Loading...
You might also like