home page top 1

बीड जिल्हयात चारा छावणीच्या वादातून शेतकर्‍याचा खून

बीड : पोलीसनामा ऑनलाईन – बीड जिल्ह्यातील वडवणी येथील संत भगवानबाबा चारा छावणीमध्ये पशुधन घेऊन आलेल्या दोन शेतकऱ्यांमध्ये झालेल्या वादाचे पर्यावसन हाणामारीत झाले. या हाणामारीत काठी डोक्यात वर्मी बसल्याने एका शेतकऱ्याचा दुर्देवी मृत्यू झाला. मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला आहे. गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

श्रीमंत लक्ष्मण नागरगोजे (वय ४०) असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

वडवणीत संत भगवान बाबा सेवाभावी संस्था चारा छावणीवर पशुधन घेऊन आलेले शेतकरी वास्तव्यास आहेत. सायंकाळच्या सुमारास या शेतकऱ्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली. भांडण करणाऱ्या शेतकऱ्यांच्या वादात नागरगोजे यांच्या डोक्यात काठी लागली.

त्यांना जखमी अवस्थेत जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने बीड जिल्ह्यात खळबळ माजली आहे. मात्र शेतकऱ्यांमध्ये वाद का झाला ते समजू शकले नाही. दरम्यान मृताच्या नातेवाईकांनी मृतदेह पोलीस ठाण्यासमोर ठेवला आहे. गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्याची मागणी नातेवाईकांनी केली आहे.

आरोग्य विषयक वृत्त – 

बिहारमध्ये इन्सेफेलाइटिस आजाराने १९ मुलांचा मृत्यू

देहूत महिलांसाठी विनामूल्य कॅन्सर तपासणी

गर्भपाताची औषधे विकणाऱ्या ऑनलाईन पोर्टलविरोधात एफआरआय

Loading...
You might also like