मुलाकडूनच वडिलांचा खून

लोणी काळभोर : पोलीसनामा ऑनलाइन – व्यसनाधिन मुलाने आपली पत्नी नांदायला का आणत नाही असे म्हणत आपल्याच जन्मदात्या पित्यास मारहाण करुन गळा दाबून हत्या केली. या घटनेमुळे थेऊर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. लोणी काळभोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शिवाजी विष्णू तारु (वय 65) यांची मुलगा गोपिनाथ शिवाजी तारु याने हत्या केली आहे.

अक्षय चिंतामणी जाधव (वय 25, रा. पिंपळे गुरव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्याचे मामा गोपिनाथ तारु यांना दारुचे व्यसन असल्याने त्यांची पत्नी नांदण्यास तयार नव्हती. त्यामुळे गोपिनाथ नेहमी दारु पिऊन घरात आपल्या वडिलांसोबत भांडण करायचा. आजोबा शिवाजी तारु यांना दोन वर्षापूर्वी अर्धांगवायूचा झटका आल्याने ते जागेवर पडून होते. (दि. 2 डिसेंबर) रोजी मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास थेऊर येथून आजीने अक्षय जाधव यांची आई यांना फोन केला आणि मुलगा वडिलांना मारहाण करत असल्याचे सांगितले. त्यानंतर अक्षय व त्याची आई थेऊरला पोहोचले तेथे येऊन आजीला सोबत घेऊन पोलिस स्टेशनला तक्रार देण्यासाठी गेले परत आल्यावर पाहिले तर मामा आजोबांना बाहेर ओट्यावर पाणी पाजत होता. परंतु आजोबा निपचित पडून होते. आजीला घरी सोडून ते परत आपल्या घरी परतले.

सकाळी साडेसहाच्या सुमारास पप्पू तारु याने अक्षयला फोन करुन सांगितले की, तुझे आजोबा पहाटे साडेपाच वाजता मृत पावले. यावर अक्षय व त्याची आई थेऊरला पोहोचले. त्यांना खात्री पटली की मामानेच आजोबांची हत्या केली. लोणी काळभोर पोलिस स्टेशन मध्ये याबद्दल तक्रार देण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे करीत आहेत.

Visit : policenama.com

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like