मुलाकडूनच वडिलांचा खून

उस्मानाबाद (कळंब) : पोलीसनामा ऑनलाइन – वडिलाच्या डोक्यात लोखंडी बत्ता मारून आपल्या जन्मदात्याची मुलाने अज्ञात कारणावरून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. ही घटना कळंब तालुक्यातील वडगाव (ज) येथे घडली आहे.

याबाबत माहिती अशी की, श्रीकांत (निक्या) शशिकांत शेटे याने अज्ञात कारणावरुन त्याचे वडील शशिकांत उर्फ मिटु भिवा शेटे यांच्या डोक्यात लोखंडी बत्ता (ठोंबा) मारुन त्यांचा खुन केला आहे. याप्रकरणी पांडुरंग सदाशिव शेटे यांच्या फिर्यादीवरुन आरोपीविरुध्द येरमाळा पोलिसांत 302 गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक पंडित सोनवणे करित आहे.

वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली आहे. पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर मुलानं नेमका कोणत्या कारणामुळं खून केला याचा तपास चालु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Visit : Policenama.com