अनैतिक संबंधातून डोक्यात दगड घालून खून !

वर्धा : पोलीसनामा ऑनलाइन – प्रेमसंबंधातून एका व्यक्तीची डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रक्षाबंधना करता मित्राबरोबर आलेल्या मित्राचा महिलेच्या पतीने कैलास ढुमणे (वय २८) याचा दगडाने ठेचून खून केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शांतीनगर इथे मानलेल्या भावाला राखी बांधण्यासाठी कैलास ढुमणे सोबत आरोपी विलास कासारची पत्नी यवतमाळ वरुन पाच सहा दिवसांपूर्वी आलेले. नंतर आरोपी विलास कासार सुद्धा आला. बुधवारी (दि.१२) सायंकाळच्या सुमारास कैलास ढुमणे, विलास कासार त्याची पत्नी, छोटी मुलगी धोत्रा येथे बहिणीच्या घरी पायदळी चालत निघाले असता पाऊस आला.

त्यानंतर पाऊस वाढल्याने ते परिसरातील एका ढाब्याजवळ थांबले. पाऊस थांबत नसल्याचे पाहून तेथेच हॉटेलमध्ये जेवण करुन जवळ असलेल्या मोटरच्या शेडमध्ये झोपी गेले. रात्री १२.३० च्या दरम्यान, विलास कासार याने झोपलेल्या कैलासाच्या डोक्यात दगड घालून ठेचून काढलं. ढाबाचालकाने घडलेल्या घटनेची माहिती रामनगर पोलिसांना दिली. माहिती मिळताच तात्काळ उपविभागीय अधिकारी पियुष जगताप, रामनगर पोलीस स्टेशनचे ठाणेदार धनाजी जळक, महेश इटकर श्वान पथक घटनास्थळी दाखल झाले.

पोलिसांनी कैलासला जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनस्थळावरुन खून करण्यात आलेलं दगड जप्त करण्यात आले. या प्रकरणी विलास कासार याच्याविरोधात रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केलं असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा. WhatsAPP

You might also like