आईचा खून दुसऱ्याने केल्याचा बनाव करणाऱ्या मुलास अटक

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या आईचा खून कोणी दुसऱ्याने केल्याचा बनाव करणाऱ्या मुलास त्याच्या प्रेमात अडसर करते म्हणून प्रेयसीच्या मदतीने खून केला असल्याचे लोणीकंद पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आले आहे. लोणीकंद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वढू खुर्द (ता हवेली) येथे राहणारा विशाल राम वंजारी (वय २०) याने लोणीकंद पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती की त्याच्या आईचा सुशीला वंजारी यांचा उसने पैशावरून शिवा देशमुख (जालना) याने खून केला.

या खुनाचा तपास करत असताना परिस्थितीजन्य पुरावा आणि तक्रारदार व साक्षीदार यांच्यात विसंगत जवाब आढळून आल्याने पोलिसी खाक्या दाखवल्यावर तक्रारदार विशाल वंजारी यानेच आपल्या प्रेयसीच्या मदतीने आपली आई हीचा खून केला. विशाल हा कायम आईचे पैसे चोरत असे.रविवारी असेच १५,५०० रु चोरल्यावरून आई व मुलात मोठे भांडण झाले तेंव्हा त्याच्या प्रेयसीच्या मदतीने तीक्ष्ण हत्याराने मानेवर पोटात वार करून खून केला व घरासमोर मृतदेह आणून टाकला व पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला. तरीही लोणीकंद पोलिसांनी काही तासातच याची उकल केली.

ही कामगिरी हवेलीच्या उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ सई भोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रताप मानकर व पद्माकर घनवट, विवेक वेताळ, सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज नवसारे, नितीन आतकरे, केशव वाबळे, सांगडे, पोलीस उपनिरीक्षक हनुमंत पडळकर, विक्रम जाधव, स्नेहल चरापले, बाळासाहेब सकाटे, श्रीमंत होनमाणे, रघुनाथ शिंदे, समीर पिलाने, सागर कडू, ऋषीकेश व्यवहारे, संतोष मारकड व प्रशांत धुमाळ यांनी केली.