पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानाजवळ प्राॅपर्टी ब्रोकरचा खून ; परिसरात प्रचंड खळबळ

किसनराव हुंडीवाले विरशैव लिंगायत समाजाचे जेष्ठ समाजसेवक

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – अकोल्यात प्रॉपर्टी ब्रोकर आणि व्यावसायिकाचा भरदिवसा खून करण्यात आला आहे. सार्वजनिक न्याय नोंदणी व सहाय्यक संस्था निबंधक कार्यालयात आल्यानंतर फायर एक्सींग्यूशरच्या सिलेंडरने मारहाण करून त्यांचा खून करण्यात आला. शहरात भरदिवसा पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानापासून काही अंतरावरच ही घटना घडल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. किसनराव हुंडीवाले असे खून करण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. ते विरशैव लिंगायत सामाजाचे जेष्ठ समाजसेवक होते. याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला.

किसनराव हुंडीवाले हे शहरातील प्रॉपर्टी डिलर आहेत. ते सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात दुपारी साडेबाराच्या सुमारास ते आलेले असताना त्यांच्यावर हल्लेखोरांनी हल्ला केला. त्यांच्यावर एक्स्टींग्यूशच्या सिलेंडरने वार करण्यात आले. किसनराव हुंडीवाले यांचा खून जमीनीच्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे. एका राजकीय घराण्यासोबत एका शाळेच्या प्रॉपर्टीवरून त्यांचे वाद होते. याच वादातून त्यांचा खून करण्यात आला. सार्वजनिक न्यासाचे कार्यालय पोलीस अधिक्षकांच्या निवासस्थानापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.

हुंडीवाले आणि प्रथम महापौर सुमन गावंडे यांच्या कुटुंबियात शिक्षण संस्थेच्या मालकीवरून वाद होता. त्याच वादातून सुमन गावंडे यांचे पती श्रीराम गावंडे, मुलं रणजीत गावंडे, प्रवीण उर्फ मुन्ना गावंडे, विक्रम उर्फ छोटू गावंडे यांनी त्यांचा खून केला. विक्रम उर्फ छोटू गावंडे भाजपच्या युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष आहे. अशी माहिती पोलीस अधिक्षक राकेश कलासागर यांनी दिली.