home page top 1

RSS कार्यकर्त्याच्या हत्येनंतर भडकले भाजप आमदार राजा सिंह, म्हणाले – ‘खुनाचा बदला खुनानेच’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात एका आरएसएस कार्यकर्त्याची, त्याच्या गर्भवती पत्नीची आणि 8 वर्षाच्या मुलाची मंगळवारी काही व्यक्तींनी घरात घुसू हत्या केली होती. त्यानंतर आता या प्रकरणाला राजकीय रंग लागला असून तेलंगणामधील भाजपचे आमदार राजा सिंह यांनी खुनाचा बदला खुनाने घेणार असल्याचे म्हटले आहे.

राजा सिंह यांनी ट्विट करत म्हटले आहे कि, मी गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करतो कि, बंगालमध्ये झालेल्या या हत्येची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी. त्याचबरोबर त्यांनी पुढे लिहिले कि, एका हिंदू परिवारावर हल्ला झाल्यामुळे माध्यमे शांत आहेत. धर्मनिरपेक्ष आणि उदारवादि नेते कुठे आहेत. तसेच हत्येचा बदला हत्येनेच घेण्याचे देखील त्यांनी म्हटले आहे. तसेच हिंदू संघटनेसाठी काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबाचा बदला घेणार असल्याचे देखील त्यांनी म्हटले. तसेच हि हत्या कारण्याऱ्यांची अशी अवस्था करणार आहे कि, संपूर्ण भारत पाहिलं, असेही त्यांनी म्हटले. तसेच या हत्येच्या कारस्थानाचा आरोप त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर केला.

दरम्यान, भाजप नेते संबित पात्रा यांनी या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला होता. तसेच हि घटना खूप भयंकर असून हिने मला खूप अस्वस्थ केल्याचे म्हटले होते. आरएसएस कार्यकर्ता प्रकाश पाल, त्याची गर्भवती पत्नी आणि आठ वर्षांच्या मुलाची अतिशय निर्घृण हत्या करण्यात आल्याने मी दुखी झाल्याचे देखील त्यांनी यामध्ये म्हटले होते.

Visit : Policenama.com

Loading...
You might also like