SEX वर्कर महिलेच्या हत्येनं खळबळ, गुप्तांगाला इजा करून आवळला गळा

भिवंडी : वृत्त संस्था – सेक्स वर्कर असलेल्या 25 वर्षीय महिलेची गळा आवळून हत्या (murder) करण्यात आल्याची खळबळजनक घटना भिवंडी शहरातील हनुमान टेकडी येथे घडली आहे. ही महिला भिवंडीतल आसबीबी रोड हनुमान टेकडी येथे राहत होती, आणि याच ठिकाणी देहव्यापार करत होती. गुरुवारी रात्री तिची हत्या (murder) झाल्याचे आढळले. विशेष म्हणजे मागच्या वर्षी याच परिसरात देहविक्री करणार्‍या एका महिलेची अशाच प्रकारे हत्या झाली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, या महिलेच्या खोलीत गुरुवारी रात्री तीन ग्राहक आले होते. या ग्राहकांनीच तिचा खून केला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे. मारेकर्‍यांनी या महिलेचा गळा आवळून व तिच्या गुप्तांगास इजा पोहचवून हत्या केली असल्याचे आढळून आले. फरार आरोपींचा तपास पोलिसांनी सुरू केला असून भिवंडी शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींवर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत महिला बांग्लदेशी असल्याचे तपासात समोर येत आहे. ती ज्या इमारतीमध्ये राहात होती, ती खोली शेवटी असल्याने हत्येचा प्रकार खुप उशीराने समोर आला. भिवंडी शहरात देहविक्री करणार्‍या महिलेची हत्या होण्याचा हा या वर्षातील दुसरा प्रकार आहे. धक्कादायक म्हणजे याच परिसरात 2019 मध्ये एका महिलेची हत्या झाली होती. आता पुन्हा एकदा असाच प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात भितीचे वातावरण आहे. पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.