धक्कादायक ! बीडमध्ये सहा वर्षाच्या चिमुरडीचा वडिलांनी केला खून

पोलिसनामा ऑलनाईन – राज्यात कोरोनाचा कहर सुरु असतानाच बीडमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेचे धिंडवले निघत आहेत. दोन दिवसांपुर्वी शेतीच्या वादातून तीन जणांचा खून करण्याची घटना ताजी असतानाच निर्दयी बापानेच अवघ्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून केला आहे. त्यामुळे बीडमध्ये खळबळ उडाली आहे.

अमृता गणेश शिंदे असे खून झालेल्या चिमुरडीचे नाव आहे. यापृकरणाी वडवणी पोलीसांनी गणेश शिंदेला अटक केली आहे. मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार देखील त्यानेच दिली होती. वडवणी येथील चिंचोटी रस्त्यावर शेतात घर करून राहणार्‍या गणेशची मुलगी सोमवारी सकाळी बेपत्ता झाली होती. मंगळवारी दुपारी एका पाण्याने डबडबलेल्या ओढ्यात ती मृतावस्थेत आढळून आली होती. या प्रकरणांमध्ये काहीतरी घातपात असल्याची शक्यता व्यक्त केली जात होती.त्यानुसार वैद्यकीय अधिकार्‍यांच्या सल्ल्याने अमृताचा मृतदेह अंबाजोगाईला शवविच्छेदन करण्यासाठी पाठविला होता. शवविच्छेदन झाल्यानंतर गळा आवळून खून झाल्याचा निर्वाळा डॉक्टरांनी केला. त्यानुसार पोलिसांनी गणेशला अटक केले. न्यायालयाने गणेश शिंदेला सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.