सुरक्षा रक्षकाकडून कंपनीतील कामगाराचा खून

औरंगाबाद : पोलीसनामा ऑनलाईन – शुल्लक कारणावरुन सुरक्षा रक्षकाने कंपनीत काम करणाऱ्या कामगराचा खून केल्याची धक्कादायक घटना मध्यरात्री वाळूज एमआयडीसीतील श्री इंजिनिअरिंग कंपनीत घडली. जगदीश प्रल्हाद भराड (वय-३५) असे खून करण्यात आलेल्या कामगाराचे नाव आहे. तर सोमेश सुधाकर ईधाटे (रा. शिरोडी बुद्रुक) असे खून करणाऱ्या सुरक्षारक्षाकाचे नाव असून घटनेनंतर तो फरार झाला आहे. सोमेश याने जगदीशच्या डोक्यात लोखंडी फावडे मारुन खून केला.

सोमेश हा मृत कामगाराच्या ओळखीचेच आहे. वाळूज औद्योगिक वसाहतीमधील श्री इंजिनिअरिंग कंपनीत जगदीश भराड आणि अन्य कामगारांसोबत रात्रपाळीला होते. रात्री पावणे बाराच्या सुमारास आरोपी सोमेश अचानक कंपनीत आला. त्यावेळी जगदीश यांनी त्याला तु कसा काय आत आला, असा सवाल केला. तुझे येथे काहीच काम नसताना तू विनापरवानगी कंपनीत कसा घुसला असे म्हणून त्याला तात्काळ कंपनीबाहेर जाण्यास सांगितलें.

त्याचा राग आल्याने सोमेशने जगदीशसोबत वाद घालून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. जगदीश त्याला समजावत असतानाच सोमेशने कंपनीत पडलेल्या लोखंडी फावड्याच्या दांड्याने जगदीशवर हल्ला केला. या घटनेत जगदीश गंभीर जखमी झाला. त्याला इतर कामगारांनी उपचारासाठी घाटी शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, तेथील डॉक्टरांनी जगदीशला मृत घोषीत केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक अनिल गायकवाड, सुरेंद्र माळाले, नाथा जाधव आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. एमआयडीसी वाळूज ठाण्यात आरोपी सोमेश विरोधात खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
W3Schools
You might also like