व्हिडीओ शूट करताना ‘TikTok’ स्टारचा गोळ्या झाडून खून

बहादूरगड (हरियाणा) : वृत्तसंस्था – ‘TikTok’ वर व्हिडीओ करत असताना अज्ञातांनी एका तरूणावर गोळ्या झाडल्या. यामध्ये तो गंभीर जखमी झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. ही खळबळजनक घटना हिरयाणातील बहादूगडमध्ये घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मोहित मोर असे मृत्यू झालेल्या तरूणाचे नाव आहे.

मोहीत हा व्हिडीओ बनवून ‘TikTok’ वर टाकत होता. त्याचे लाखो फॉलोअर्स आहेत. मोहीतचा फोटोचा व्यवसाय असून त्याचा बहादूरगडमध्ये फोटो स्टुडीओ आहे. स्टुडीओमध्ये तो व्हिडीओ बनवत असताना त्याच्यावर हल्ला करण्यात आला. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत त्याला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला होता.

पोलिसांनी संपूर्ण परिसरात चौकशी सुरू केली आहे. हल्लेखोर हल्ला केल्यानंतर घटनास्थळावरून फरार झाले. पोलीस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत असून हल्लेखोऱांचा शोध घेत आहेत. या प्रकरणात मोहितच्या कुटुंबीयांचीही चौकशी होणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

You might also like