जिच्याशी केलं Love मॅरेज, तिलाच सर्वांसमोर चाकूनं भोसकत राहिला ती मरेपर्यंत

अमृतसर : पंजाबमूधन एक हैराण करणारी केस समोर आली आहे. येथे एका युवकाने आपल्याच पत्नीला ठार केले. त्याने चाकूने अनेक वार करून पत्नीची हत्या केली. सर्वात भयंकर गोष्ट ही आहे की, तो खुलेआम तोपर्यंत पत्नीला चाकू मारत होता जोपर्यंत तिने शेवटचा श्वास घेतला नाही. अखेर त्याने कोणत्या कारणसाठी हे राक्षसी कृत्य केले, ते जाणून घेवूयात.

पंजाबच्या मोगामधील घटना
एका न्यूज वेबसाइटनुसार ही घटना पंजाबच्या मोगा येथे घडली आहे. येथे राहणार्‍या ज्योती नावाच्या मुलीने कुटुंबाच्या विरोधात जाऊन 10 वर्षांपूर्वी युपीच्या संजय कुमारशी विवाह केला होता. प्रेमविवाहनंतर संजयने आपले खरे रंग दाखवण्यास सुरूवात केली होती. तो दारूड्या होता आणि नेहमी आपल्या पत्नीशी भांडण करत असे. याच कारणामुळे ज्योती आपल्या दोन मुलांसोबत आपल्या माहेरात राहू लागली होती आणि तिथेच मुलांना शिकवत होती.

बदला घेण्याचा रचला होता कट
संजय सतत सांगत असूनही ज्योती घरी परतली नव्हती, यामुळे दुखावलेल्या संजयने तिला मारण्याचा कट रचला होता. शुक्रवारी सकाळी ज्योती मुलांना शाळेत सोडून घरी परतत असताना गुरुद्वारा साहिबजवळ संजयने तिला थांबवले आणि चाकूने तिच्या गळ्यावर वार करण्यास सुरूवात केली. आरोपी तोपर्यंत ज्योतीवर वार करत होता, जोपर्यंत तिचा श्वास बंद झाला नाही. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने आरोपीला अटक केली आहे.