पुण्यात पतीकडून पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने घाव घालून खून

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – घरगुती वादातून पतीने पत्नीच्या डोक्यात लोखंडी गजाने घाव घालून खून केल्याची घटना विश्रांतवाडी परिसरात घडली. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी घटनास्थळी भेट दिली असून गुन्हा दाखल करण्याचे काम चालु आहे.

रमाबाई गायकवाड असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तिच्या पतीविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घरगुती वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. पती-पत्‍तीमध्ये नेमका काय वाद होता याचा तपास चालु असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, पतीने वर्मी घाव घातल्याने पत्नीचा यामध्ये मृत्यू झाला आहे. विश्रांतवाडी परिसरातील भिमनगरमध्ये ही घटना घडली आहे. पोलिस दप्‍तरी याप्रकरणाची नोंद करण्यात आली आहे.

आरोग्यविषय वृत्त –