बीड जिल्ह्यात युवकाचा खून

बीड : पोलीसनामा ऑनलाइन – जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील नागझरी येथे युवकाचा खून झाला आहे. छातीत चाकूने वार करून त्याचा खून करण्यात आला आहे. जखमी युवकाला उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी त्यास उपचारासाठी बीड येथील जिल्हा रूग्णालयात पाठवलं. मात्र, तेथील डॉक्टरांनी त्यास मयत घोषित केले.

संजय काकासाहेब चव्हाण (20) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे. खूनाचे कारण अद्याप समजलेले नाही. संजयचा मृत्यू झाल्याचे समजताच नातेवाईकांनी मृतदेह नेण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिस चौकशी करीत आहेत.