दौंडमध्ये फोटोग्राफरचा खून

दौंड : पोलीसनामा ऑनलाइन – दौंड शहरातील छायाचित्रकार केदार श्रीपाद भागवत (46, रा. शालीमार चौक, दौंड, पुणे) यांचा दौंड-लिंगाळी हद्दीत आज सकाळी मृतदेह सापडला. डोक्यात दगड घालून आणि बाटल्या फोडून मारेकर्‍यांनी खून केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेहाजवळ दारूच्या रिकाम्या बाटल्या पोलिसांना मिळून आल्या आहेत. घटनेची खबर मिळताच प्रभारी पोलिस उप अधीक्षक नारायण शिरगावकर (बारामती), पोलिस निरीक्षक सुनील महाडिक, आदींनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली.

केदार भागवत यांचा मृतदेह आज सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास आढळला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची महिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. मृतदेहाशेजारी दारूच्या रिकाम्या बाटल्या सापडल्या आहेत. याप्रकरणी दौंड पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अद्याप खुनाचे कारण समजलेले नाही.

मृत छायाचित्रकार केदार भागवत हे दौंडमधील ज्येष्ठ छायाचित्रकार श्रीपाद भागवत यांचे पूत्र आहेत. केदार भागवत यांच्या डोक्यात दगड घालून मारेकर्‍याने त्यांचा खून केल्याचे आढळले आहे. सर्व दृष्टीने प्रकरणाचा तपास सुरू आहे, असे दौंडचे पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांनी म्हटले.