Pimpri : लग्नासाठी तगादा लावल्याने गर्भवती प्रेयसीचा खून; तब्बल 10 वर्षानंतर आरोपी पोलिसांच्या ताब्यात

पिंपरी : पोलीसनामा ऑनलाइन – पिंपरी येथील प्रेमसंबंधातून गर्भवती राहिलेल्या युवतीने प्रियकराकडे लग्नाचा तगादा लावल्याने, त्याने २०११ रोजी तिचा खून केला गेला. त्यानंतर आरोपी बेपत्ता झाला. वाकड पोलिसांनी तपास करत तब्बल दहा वर्षांनी ह्या आरोपी तरुणाला अटक केली. चांदणी सत्यवान लांडगे (वय २२) असे खून झालेल्या युवतीचे नाव असून, तिची आई सविता लांडगे (वय ५२, रा. बलदेव नगर, पिंपरी) यांनी या प्रकरणी पिंपरी पोलीस स्टेशनमध्ये शनिवारी (दि. २०) तक्रार दाखल केली आहे. यावरून किशोर लक्ष्मण घारे (वय ३२, रा. डोणे, ता. मावळ) याला अटक करण्यात आले आहे.

अधिक माहिती अशी, मृत चांदणी ही हिंजवडी येथे एका कंपनीत कामाला होती. त्यावेळी आरोपी किशोर घारे याच्यासोबत तिचे प्रेमसंबंध होते. आरोपी ११ सप्टेंबर २०११ रोजी चांदणीच्या घरी आला आणि तिला दुचाकीवरून घेऊन गेला. त्यानंतर चांदणी घरी परतली नाही. तेव्हापासून चादणीची आई त्याच्याकडे विचारणा करीत होती. चांदणी माझ्यासोबत आहे, असे प्रत्येक वेळी आरोपी सांगत होता. यावरून तिच्या आईने २७ जुलै २०१३ रोजी पिंपरी पोलिसांकडे तक्रार नोंदवली होती. तर चांदणी घरातून निघून गेली त्यावेळी तिच्याकडे ५ ग्रॅमचे सोन्याची कर्णफुले व पायात चांदीच्या दोन पट्ट्या होत्या. गेल्या दोन महिन्यांपूर्वी आरोपी किशोर हा मारुंजी येथे भाजी विक्री करीत असल्याचे समजल्यावर. त्यानुसार त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चांदणीचा २०११ मध्ये खून केला असल्याचे मान्य केल्याने त्यावर खुनाचा गुन्हा वाकड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.

दरम्यान, आरोपी किशोर घारे याने गळा आवळला त्यानंतर चाकूने गळा कापून तिचे धड आणि शिर वेगवेगळ्या ठिकाणी टाकून दिले होते. तसेच घरच्यांशी भांडण करून घरातून निघून गेला. त्यामुळे तो बेपत्ता झाला असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबीयांनी पोलिसांकडे केली होती. दरम्यान आरोपी घारे हा महामार्ग व टोलनाक्यावर चहा विक्री करीत होता. परंतु, या १० वर्षांच्या काळात तो रात्री झोपू शकला नाही. आज रात्री मी पूर्ण झोप घेऊ शकतो, असे म्हणून आरोपी घारे याने पोलिसांकडे गुन्ह्याची कबुली दिली आहे, तर त्याने चांदणीचा मृतदेह कुठे टाकून दिला होता, याचा शोध पोलिसांकडून सुरू आहे.