पुण्यातील गंगाधाम चौकातील ‘तो’ खून सख्ख्या भावानं केल्याचं उघड

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – मार्केटवॉर्ड भागातील गंगाधामजवळ झालेल्या त्या सुरक्षारक्षकाचा खून कौटुंबिक वादातून सख्ख्या लहान भावानेच केल्याचे समोर आले आहे. त्याला बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे.

सुरेश खाजाप्पा खानेकर (वय ३२) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. यात प्रकाश खाणेकर (३४, रा.मुळ दुधणी, अक्कलकोट, जि.सोलापूर) या व्यक्तीचा खून झाला आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार, प्रकाश दिवसा बिगारी काम करुन रात्री त्या ठिकाणी सुरक्षारक्षक म्हणून काम करत. शनिवारी दुपारी शेडमध्ये त्यांचा खून केल्याचे आढळून आले होते. त्यांना भांडणात लोखंडी पाईपने त्यांना जबर मारहाण केली. यामध्ये त्यांचा मृत्यू झाला. सुरुवातीला पत्ते खेळण्याच्या वादातून हा खून झाल्याचा संशय होता. पण, दोन भावांमध्ये कौटुंबक कारणावरून झालेल्या वादात लहान भाऊ सुरेश याने केलेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक मुरलीधर खोकले करत आहेत.