प्रेमप्रकरणातून 27 वर्षीय शिक्षिकेचा खून, प्रकरणाचा तपास सुरू

अमरावती : पोलिसनामा ऑनलाईन – अमरावतीमधील अचलपूरमधील शिक्षिकेच्या हत्याप्रकरणात पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. हिंगोली जिल्ह्यातील पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला असून शुक्रवारी सकाळी या महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शारदा मांगीलाल बेलसरे या 27 वर्षीय शिक्षिकेचा मृतदेह हिंगोली तालुक्यातील सेनगाव येथे एका तलावात आढळून आला होता. त्यानंतर मृतदेहाची ओळख पटल्यानंतर मृत महिलेच्या भावाने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर चार दिवसांनी या तरुणीच्या मृतदेहावर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत. प्रेमप्रकरणातून हि हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. तसेच आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर उभे आहे. गळा आवळून या युवतीची हत्या करण्यात आल्याची माहिती पोलिसांना पोस्ट मॉर्टम अहवालात प्राप्त झाली आहे.

तपासासाठी विशेष पथक
या तरुणीच्या हत्येच्या तापासासाठी पोलिसांनी विशेष पथक तयार केले असून गुन्हे अन्वेषण विभागाच्या वतीने आरोपींचा शोध सुरु केला आहे. त्याचबरोबर विविध बाबींचा तपास केला जात असून विलास पानसे या युवकाबद्दल पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

Visit : Policenama.com