मुंबईत प्रियकराच्या मदतीने केली पतीची हत्या, किचनमध्ये पुरलेल्या मृतदेहाचे रहस्य 6 वर्षाच्या मुलीने सांगितले

दहिसर : वृत्त संस्था – मुंबईच्या दहिसर पूर्वच्या खान कंपाऊंडमध्ये एक हादरवणारे प्रकरण समोर आले आहे. पोलिसांनी 6 वर्षांच्या मुलीच्या सांगण्यावरून एका मर्डर केसचा खुलासा केला आहे. निष्पाप मुलीने पोलिसांना सांगितले की, तिच्या डोळ्यांसमोर आईने आणि तिच्या प्रियकरासमोर तिच्या वडीलांची हत्या केली होती. या घटनेची माहिती पोलिसांना हत्येच्या 11 दिवसानंतर निष्पाप मुलीने दिली. मुलीकडून मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक करून जेलमध्ये पाठवले.

3 जून राशीफळ : आज ‘प्रीतयोग’, मिथुन, सिंह आणि तुळसह ‘या’ राशींच्या भाग्यात आनंद, इतरांसाठी असा आहे गुरुवार

 

उत्तर प्रदेशच्या गोंडामध्ये रईस शेखचा 2012 मध्ये शाहिदा (27) शी विवाह झाला होता. लग्नानंतर दोघे दहिसर पूर्वच्या खान कंपाऊंडमध्ये भाड्याच्या घरात राहात होते. रईस दहिसर पूर्व, रेल्वे स्टेशनजवळ एका कपड्याच्या दुकानात नोकरी करत होता. पत्नी 6 वर्षांची मुलगी आणि अडीच वर्षाच्या मुलासोबत घरीच असायची.

Photos : 133 किलो होते वजन, आयपीएस अधिकाऱ्यानं 9 महिन्यात कमी केलं 43 किलो वजन, वायरल झाली छायाचित्रे

 

याच दरम्यान शेजारी राहणार्‍या अनिकेत उर्फ अमित मिश्रा सोबत शाहिदाचे अवैध संबध जुळले. हळुहळु ही गोष्ट रईसपर्यंत पोहचली तेव्हा त्याने विरोध करण्यास सुरूवात केली. पतीचा रोजचा विरोध शाहिदाला त्रासदायक वाटू लागला आणि तिने प्रियकर अमितसोबत मिळून रईसला मार्गातून दूर करण्याचा कट रचला.

BIG NEWS

Pune : न्यायालयाच्या अटी न पाळने रविंद्र बर्‍हाटेचा साथीदार यश फालेला पडले महागात; पोलिसांनी आरोपीला केली पुन्हा अटक

राहुल गांधींनी Twitter वर अनेक नेत्यांना-पत्रकारांना केलं Unfollow, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

हत्येनंतर मृतदेहाचे केले चार तुकडे

पोलिसांनी सांगितले की, 11 दिवसापूर्वी मृताने आपल्या पत्नीला तिच्या प्रियकरासोबत नको त्या आवस्थेत पाहिले. यावर दोघांमध्ये मोठे भांडण झाले आणि दोघांनी घरात ठेवलेल्या चाकूने रईसचा गळा कापला. याच दरम्यान 6 वर्षाची मुलगी अडीच वर्षाच्या भावासोबत घरात आली. तेव्हा आई शाहिदाने मुलीला धमकी दिली जर तिने कुणाला सांगितले तर बापासारखे कापून जमीनीत गाडून टाकेन.

रईसचे अचानक गायब होणे त्याचे मित्र आणि ओळखीच्यांना पटत नव्हते. खान कंपाऊंडमध्ये राहणार्‍या त्याच्या एका मित्राने दहिसर पोलीस स्टेशनमध्ये रईसच्या बेपत्ता होण्याची तक्रार नोंदवली. दुसरीकडे शाहिदाने प्रियकर अमितच्या मदतीने रईसच्या मृतदेहाचे चार तुकडे करून स्वयंपाक घरात गाडला आणि त्याचा मोबाइल आपल्याकडे ठेवला होता. गोंडाहून त्याच्या घरातील लोकांचा फोन आला की शाहिदा सांगत असे की, तो न सांगताच कुठेतरी गेला आहे.

तीन दिवसांपूर्वी गावाहून त्याचा भाऊ आला. संधी मिळताच 6 वर्षाच्या मुलीने आपल्या काकाला आई आणि तिच्या प्रिकराने केलेले सर्व कृत्य सांगितले. त्यानंतर भाऊ दहिसर पोलीस स्टेशनला गेला आणि तिथे अधिकार्‍यांना सर्व हकीकत सांगितली. मंगळवारी पोलिसांनी घराच्या स्वयंपाक घराची जमीन खोदून तेथून मृतदेहाचे चार तुकडे ताब्यात घेतले.

READ ALSO THIS :

Pune : दोनशे नागरिकांची 7 कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक ! धनकवडीतील आदर्शनागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालिका व अध्यक्षा सुनीता नाईक यांना अटक, 5 दिवस पोलीस कोठडी

Pune : देहुरोडमध्ये तरुणीवर सामुहिक बलात्कार ! व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार अत्याचार