सलून उघडताच, येऊ लागला दुर्गंध, बेड उघडताच बसला धक्का, सापडला मुलीचा मृतदेह

नवी दिल्ली : वृत्तसंस्था –   हरियाणाच्या सोनिपत येथून मुलीचा मृतदेह सापडल्यावर एकच खळबळ उडाली आहे. एकतर्फी प्रेमातून या युवतीची हत्या केल्याचे म्हंटले जात आहे. रविवारी मृत महिला शिवानीसोबत काम करणाऱ्या नीरजने रविवारी जेव्हा ब्युटी पार्लर उघडले, तेव्हा त्याला दुर्गंध येऊ लागला. त्यानंतर त्याने पलंग उघडला आणि त्यामध्ये शिवानीचा मृतदेह पाहून त्याला धक्का बसला. दरम्यान, शिवानीची गळा आवळून हत्या केल्याचे समजते, ज्यानंतर तिचा मृतदेह पार्लरच्या पलंगामध्ये लपविला होता. शिवानीचे वडील विनोद यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यांनी आरिफ नावाच्या मुलावर आरोप केला आहे कि, तो जवळजवळ 3 वर्षांपासून आपल्या मुलीला त्रास देत होता. त्याला कंटाळून त्यांनी आपले घरही बदलले होते. वडिलांच्या विधानाच्या आधारे पोलिसांनी आरिफविरूद्ध गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू आहे.

शिवानीच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले की, त्यांची मोठी मुलगी श्वेता आणि लहान मुलगी शिवानी कुंडली टीडीआयमध्ये टच अँड फेअर नावाचे सलून चालवतात. आरिफ नावाची व्यक्ती शिवानीला त्रास देत असे. अरिफवर शुक्रवारीच शिवानीची हत्या केल्याचा आरोप आहे. तो शुक्रवारपासून बेपत्ता होता. ज्याचा शोध घेतला जात होता

जेव्हा दोन्ही मुलींबरोबर काम करणारा नीरज सलूनमध्ये पोहोचला, तेव्हा त्याला दुर्गंध आला, सलूनला लागून बेड उघडला, त्यात शिवानीचा मृतदेह पाहून तो चकित झाला. त्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. पोलिसांनी घटनास्थळी पोहचून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठविला. शिवानीचे वडील विनोद यांच्या विधानावरून पोलिसांनी आरिफविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्यांचा आरोप आहे की, एकतर्फी प्रेमातून त्यांच्या मुलीची हत्या करण्यात आली. पोलिस आरोपीच्या शोधात ठिकठिकाणी तपास करीत आहेत.