एकतर्फी प्रेमातून तरुणाचा खून

नागपूर : पोलीसनामा ऑनलाइन – आपल्या मित्राचाच खून केल्याची खळबळजनक घटना नागपूरमध्ये घडली आहे. ही घटना मंगळवारी रात्री वाठोडात घडली आहे. या प्रकरणातील आरोपी पोलिसांच्या हाती न लागल्याने पोलिसांकडून या घटनेची माहीती देण्यास टाळाटाळ केली जात आहे.

आरोपी विकास नागोसे आसून मंगळवारी रात्री गंगा सिलेब्रेशनजवळ एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृण खून करण्यात आला. रात्री उशिरा मृत तरुणाची ओळख पटली असून तो अनमोलनगर येथील रहिवाशी हिमांशु मनोहर डेंगे (वय 22) आहे. हिमांशु हा कुलर कंपनीत कामाला होता. विकास हा मजुरी करतो. त्याची काही दिवासांपूर्वीच मयत हिमांशुसोबत मैत्री झाली होती. विकासचे हिंमाशुच्या घरी येणे-जाणे होते.
मयत हिमांशू आणि त्याच परिसरात राहणाऱ्या 15 वर्षीय मुलीसोबत मैत्री होती. मुलगी हिंमाशुवर प्रेम करत होती. दरम्यान, विकास याने त्या मुलीकडे मैत्रीची मागणी केली. मात्र, तिने त्याच्यासोबत मैत्री करण्यास नकार दिला. मुलीने विकास याला प्रतिसाद दिला नसतानाही तो तिच्या मागे लागला होता. यासंबंधी मुलीने हिमंशुला सांगितले. हिमांशूने मुलीपासून दूर राहण्यास विकासला सांगितले. यावरून दोघांमध्ये वाद झाले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास त्यांच्यात वाद झाले. याच वादातून विकासने हिमांशूचा दगडाने ठेचून खून केला.

गुन्हा केल्यानंतर विकास फरार झाला आहे. तो मध्यप्रदेशात गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे एक पथक मध्यप्रदेशात रवाना करण्यात आले आहे. आरोपी हाती लागल्यानंतर खुनाचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. विद्यार्थीनी आणि हिमांशुच्या कुटुंबीयांकडे चौकशी केली असता हा प्रकार एकतर्फी प्रेमातून झाला असल्याचे समोर आले आहे. वाठोडा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/