पाकीटमारीच्या हिश्श्यावरून हौदात बुडवून केला खून

औरंगाबाद  :  पोलीसनामा ऑनलाइन

मुकुंदवाडीतील राजनगरमध्ये एका पत्र्याच्या शेडमध्ये पंधरा दिवसांपूर्वी एका तरुणाचा मृतदेह आढळून आला होता. आरोपीने कोणताही पुरावा मागे सोडला नसल्याने पोलिसांना तपास करताना अडथळे येत होते. अखेर औरंगाबाद गुन्हे शाखेने गुन्ह्याचा तपास करुन आरोपीला गजाआड केले. आरपोने पाकीटमारीच्या हिश्श्यावरुन तरुणाला हौदात बुडवून त्याचा खुन केल्याची कबुली दिली.

पांडुरंग रामा पवार असे खुन झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर रमेश उर्फ रम्या दशरथ जाधव असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

[amazon_link asins=’B078BNQ313′ template=’ProductCarousel’ store=’policenama-100′ marketplace=’IN’ link_id=’56cbcee1-bb38-11e8-bec3-67f3a8c28093′]

मुकुंदवाडी, राजनगरातील यादव यांच्या पत्र्याच्या शेडमधून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन कुजलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी घाटीत दाखल केला होता. मृतदेह कुजल्याने तो स्त्री जातीचा आहे की पुरुषाचा हेही कळत नव्हते. डॉक्टरांनी मृतदेह पुरुष जातीचा असून, त्याचे वय ३५ ते ४० वर्षे असल्याचा अहवाल दिला होता. तसेच दोन महिन्यांपूर्वी हा खून करण्यात आल्याचाही उल्लेख अहवालात करण्यात आला होता. तसेच ओळख पटू नये म्हणून मारेकर्‍यांनी कपडे व इतर वस्तूंची विल्हेवाटही लावली होती. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली होती.

गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांकडून पोलीस उपायुक्तांना धक्काबुक्की 

मृतदेह सापडल्यानंतर उपायुक्त निकेश खाटमोडे, गुन्हे शाखेचे सहायक निरीक्षक डॉ. नागनाथ कोडे, पोलीस निरीक्षक मधुकर सावंत आदींच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असता त्यांना शंका आली. शेडमालक यादव यांना बोलावले असता त्यांनी त्यांच्याजवळ असलेल्या किल्लीने कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला असता दुसरे कुलूप लावलेले असल्याचे दिसले. यावरून कोणीतरी तरुणाचा खून करून दुसरे कुलूप लावल्याचे दिसले. यावरून तरुणाचा खून झाल्याच्या दिशेने तपासाला सुरुवात करण्यात आला. शेडजवळ येणार्‍या जाणार्‍यांची माहिती घेतली असता एक महिला व त्याच्यासोबत पुरुष येत असल्याचे समजले. यावरून दोघांच्या वर्णनावरून गुन्हे शाखेच्या पोलिसांनी नांदेड, परभणी येथील रेल्वेस्थानकावर जोडप्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली असता या वर्णनाचे जोडपे हे परतूर येथे राहत असल्याची माहिती मिळाली.

‘देसी गर्ल’ प्रियांका चोप्राला आहे ‘हा’ आजार

पोलीस निरीक्षक मधुकर सावंत यांच्या पथकाने परतूर येथून रमेश उर्फ रम्या दशरथ जाधव यास ताब्यात घेतले. पोलिसांनी खाक्या दाखविताच त्याने मृत पांडुरंग रामा पवारसह रेल्वेत पाकीटमारी करत असल्याची कबुली दिली. पाकीटमारीत पैशाच्या हिश्श्यावारून दोघांत वाद झाला. यावरून आरोपी रम्या जाधव याने मयतास घरासमोरील हौदात बुडवून बेदम मारहाण केली. यात तो मृत झाल्याचे लक्षात येताच त्याने घरासमोरील यादव यांच्या शेडचे कुलूप तोडून मृतदेह कोंडून दुसरी कुलूप लाऊन पळ काढल्याची कबुली दिली.