NCRB : पाण्यासाठी सांडले ‘रक्त’, 14 जणांचे झाले खून

अहमदाबाद : वृत्तसंस्था – देशात पाण्याचे संकट तीव्र होत असून यातून तिसरे महायुद्ध होण्याचे भाकीत करण्यात आले आहे. भारतात, मात्र, पाण्याच्या वादातून नागरिकांचे खून पडत आहेत. नॅशनल क्राईम रेकोर्ड्स ब्युरोच्या अहवालानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाण्याच्या वादातून महाराष्ट्रात तब्बल 14 जणांचे खून झाले आहेत. देशात पाण्याच्या वादातून गुजरातमध्ये सर्वाधीक खून होत असल्याचे अहवालावरून समोर आले आहे.

नॅशनल क्राइम रेकोर्ड्स ब्युरोच्या अहवालात ही धक्कादायक माहिती समोर आली असून पाण्याच्या वादातून गुजरातमध्ये 2018 मध्ये 18 खून झाले आहेत. पाण्याच्या वादातून देशात एकूण 91 जणांचे खून झाले असून बिहारमध्ये 15 जणांनी आपले प्राण गमावले आहेत. तर महाराष्ट्राचा यामध्ये तिसरा क्रमांक लागतो महाराष्ट्रात 14 जणांचे खून झाल्याचे आकडेवारीवरून समोर आले आहे.

गुजरातमध्ये 2017 मध्ये पाच जणांचे पाण्याच्या वादातून खून झाले झाले होते. तर, 2018 मध्ये यात वाढ झाली असून 18 जणांचे खून झाले आहेत. हीच संख्या मध्य प्रदेशात केवळ दोन आहे. 2017 मध्ये मध्यप्रदेशात पाण्याच्या वादातून दोघांना आपले प्राण गमावले होते. मात्र 2018 मध्ये यामध्ये वाढ झाली असून या वर्षात 14 जणांनी पाण्यासाठी आपले प्राण गमावले आहेत. महाराष्ट्रात 2017 मध्ये 14 जणांना आपले प्राण गमवावे लागले असल्याचे या अहवालातून समोर आले आहे.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like