दै. पुण्यनगरी, मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, यशोभुमी, कर्नाटक मल्लासह इतर काही ‘अग्रगण्य’ दैनिकाचे संस्थापक मुरधीलर शिंगोटे यांचे निधन

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – दैनिक पुण्यनगर, मुंबई चौफेर, आपला वार्ताहर, कर्नाटक मल्ला, यशोभुमीसह इतर काही अग्रगण्य दैनिकाचे संस्थापक मुरलीधर बाबा शिंगोटे यांचे आज (गुरूवार) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या मुळगावी निधन झाले आहे.

मुरलीधर बाबा शिंगोटे हे मुळचे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील गायमुखवाडी येथील होते. वयाच्या 83 वर्षी त्यांचं वृध्दापकाळानं निधन झालं.