Murlidhar Mohol | ‘हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्याचा रोडमॅप’ – मुरलीधर मोहोळ

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Murlidhar Mohol | लोकसभा निवडणुकीसाठी (Pune Lok Sabha Election 2024) भारतीय जनता पार्टीने (BJP) संकल्पपत्र म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या गॅरेंटीचा दस्तावेजच आहे. हे संकल्पपत्र म्हणजे विकसित भारताचे स्वप्न गाठण्यासाठीचा जणू रोड मॅपच दिलेला आहे, अशी प्रतिक्रिया पुणे लोकसभेचे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केली. (BJP Manifesto)

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने काल आपला जाहीरनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते प्रसिद्ध केला. या जाहीरनाम्याला संकल्पपत्र असे नाव देण्यात आले आहे. या संकल्पपत्रावर मुरलीधर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली.(Murlidhar Mohol)

मुरलीधर मोहोळ यांनी म्हटले की, जनसंघ आणि त्यानंतर आमच्या पक्षाच्या प्रत्येक संकल्पपत्रात अयोध्येत श्री राम मंदीर
बांधणे आणि काश्मिरमधील ३७० कलम हटवण्याबरोबरच समान नागरी देशात आणण्याचा संकल्प पक्षाने केला होता.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, देशातील मतदारांनी पंतप्रधान मोदीजींवर विश्वास ठेवून केंद्रात बहुमताने सलग दोन वेळा
सरकार निवडून दिले आणि देशवासीयांना अयोध्येत रामाचे दर्शन घेता येऊ लागले, तसे काश्मिरमध्ये मुक्तसंचार करता
येऊ लागला आहे.

मोहोळ पुढे म्हणाले की, पुढील पाच वर्षात समान नागरी कायद्यासह काही मोठी उदिष्ट ठेवली आहेत.
ती सर्व पूर्ण होतील, या मोदीजींच्या गॅरेंटीवर देशवासीयांचा आणि पुणेकरांचा विश्वास आहे.
देशवासीयांच्या विश्वासावरच हे मोदीजींच्या गॅरेंटीचे संकल्पपत्र देशवासियांसमोर मांडले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Supriya Sule On Firing Outside Salman Khan House | सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार, सुप्रिया सुळेंनी घेतली दखल, म्हणाल्या ”हे गृह खात्याचे अपयश…”