Murlidhar Mohol | मुरलीधर मोहोळांनी दिला मतदारांना शब्द, म्हणाले – ”पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह फेडणार”

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Murlidhar Mohol | पुणे लोकसभेचे (Pune Lok Sabha) महायुतीचे (Mahayuti) भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी आज उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी पुण्याचे ग्रामदैवत कसबा गणपतीचे (Kasba Ganpati) सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी माहोळ यांनी समस्त मतदारांना शब्द देताना म्हटले की, पुणेकरांचे मतदान स्वरूप कर्ज, विकास कामांच्या रुपात व्याजासह परतफेड करणार आहे.(Murlidhar Mohol)

आज महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तत्पूर्वी, कोथरूडमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून रॅली काढण्यात येणार आहे. रॅलीच्या समारोपानंतर जाहीर सभा होणार असून या सभेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) उपस्थित राहणार आहेत.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी प्रतिक्रिया देताना मुरलीधर मोहोळ म्हणाले, पुण्याला देशातील सर्वोत्तम शहर बनवण्याची संधी मला मिळत आहे. याचे मला समाधान आहे. मताधिक्य मिळणे किंवा निवडणूक जिंकणे यापेक्षा महत्वाचे आहे की, त्यानंतर मिळालेल्या जबाबदारीचे भान आतापासून आहे.

मुरलीधर मोहोळ पुढे म्हणाले, प्रत्येक पुणेकर मतदारांची काहीतरी अपेक्षा आहे.
आज पुणेकर कर्ज स्वरुपात मला मतदान करतील. मी त्यांच्या अपेक्षा, कर्ज हे कामाच्या स्वरुपातून व्याजासहीत परत करणार आहे.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, वंचित बहुजन आघाडीचे Bahujan Vanchit Aghadi (VBA) उमेदवार वसंत मोरे (Vasant More)
आणि काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांनी नगरसेवक असताना ज्या त्या प्रभागात चांगली
कामे केली आहेत. पण ही निवडणूक देशाची आहे. त्यामुळे पुणेकर मोठा विचार करणार आहेत.

देशाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी कोणाला पाठवायचे आणि आपला माणूस कोण याचा विचार करणार आहेत.
देशाचे प्रतिनिधित्व हे मोदीजीच करणार आहेत आणि पुणेकर निश्चितच महायुतीचा उमेदवार निवडून देतील, असा
विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Vasant More-Pune Lok Sabha | पुणे लोकसभेसाठी वंचित बहुजन आघाडीकडून वसंत मोरे यांनी भरला अर्ज

Pune Police Seized Firearms | पुणे पोलिसांकडून 42 पिस्तुल, 74 जिवंत काडतुसे जप्त; 28 गुन्हेगार गजाआड

JM Road Firing Case Pune | पुण्यात बापानेच दिली मुलाला गोळ्या घालण्यासाठी 75 लाखाची सुपारी! पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितली हकीकत, धक्कदायक कारण आलं समोर (Video)