Murlidhar Mohol On Bhim Jayanti | मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना सुनावलं, ”बाबासाहेबांच्या स्मृती मोदी सरकारने जतन केल्या, अफवा पसरवू नका”

पुणे : Murlidhar Mohol On Bhim Jayanti | संविधान बदलण्याची विरोधकांची टीका ही धादांत खोटी असून ते केवळ खोटे बोलण्याचे काम करत आहेत. बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि राज्यातील महायुती सरकारने (Mahayuti Govt) केले, असे म्हणत आज पुणे लोकसभेचे महायुतीचे (Pune Lok Sabha Election 2024) उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी विरोधकांना सुनावले. पुण्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

सत्ताधारी भाजपकडून राज्यघटना बदलण्याचे काम सुरू असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी आज पुण्यातील आंबेडकर पुतळ्याला अभिवान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना केली होती. या टीकेला मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, बाबासाहेबांनी सर्वांना दिलेले विचार आणि शिकवण ही समाजाचे हित जपण्यासाठी कायम प्रेरणा देते, त्यांच्या विचारावर आज देश चालत आहे. संविधान बदलण्याची विरोधकांची टीका ही धादांत खोटी असून ते केवळ खोटं बोलण्याचा काम करत आहेत.

ते पुढे म्हणाले, बाबासाहेबांच्या स्मृती जपण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यातील महायुती सरकारने केले.
इंदू मिल स्मारक असो की लंडनमधील घर, हे आमच्या सरकारने जतन केले आहे. विरोधकांनी राजकारण सरळ करावे,
खोटं बोलून अफवा पसरवण्याचा प्रयत्न करू नये.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, बोलायला गेलो तर खूप काही निघेल, आम्ही कोणावरही व्यक्तिगत बोलत नाही.
या देशातील जनता विकासाला पाठींबा देणारी असून कोणत्याही भावनिक आणि खोट्या प्रचाराला मत देत नाही.

ते पुढे म्हणाले, दहा वर्षातील विकास कामांनी जागतिक स्तरावर भारताला महासत्ता बनवण्याचे काम मोदी सरकारने केले.
त्यामुळे देशातील जनतेने पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्याचा ठरवले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Sushma andhare | सुषमा अंधारे यांच्याविरूद्ध निवडणूक आयोगाकडे तक्रार, ‘त्या’ पत्रकार परिषदेतील छोट्या बाळाच्या उपस्थितीवर आक्षेप

Pimpri Chinchwad Crime Branch | पिंपरी : घरगुती गॅसचा काळाबाजार करणाऱ्यावर गुन्हे शाखेची कारवाई, सव्वा तीन लाखांचा मुद्देमाल जप्त