Murlidhar Mohol On Pune Drug Case | अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि मनुष्यबळ नियुक्त करण्याच्या सूचना; केंद्रीयमंत्री मोहोळ यांची माहिती

ADV

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Murlidhar Mohol On Pune Drug Case | पुण्यातील एफसी रस्त्यावरील (FC Road Pune) लिक्विड, लेजर, लाऊंज या हॉटेलमधील (L3 – Liquid Leisure Lounge) बॉशरूममध्ये काही अल्पवयीन मुले ड्रग्जचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्ये पार्टीसाठी कोणतीही वयाची मर्यादा ठेवण्यात आली नव्हती. यावरून आता राजकारण चांगलेच तापले आहे.

या पार्टीमध्ये काही तरुण टॉयलेटमध्ये ड्रग्ज घेताना आढळून आले तर अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात होती. कल्याणीनगर अपघात प्रकरणानंतर पुणे पोलीस आयुक्तांनी शहरातील सर्व पब्स आणि रुफटॉप्स मालकांना इशारा दिला होता.

परंतु ड्रग्स सारख्या गंभीर विषयाकडे देखील पोलीस (Pune Police) आणि उत्पादन शुल्क विभागाचे (Excise Department Pune) दुर्लक्ष होत असल्याची चर्चा सुरू होती. त्याबाबत आमदार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) आणि शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी याविरोधात सातत्याने आवाज उठवला होता.

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात पुणे पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात आले आहे. यापूर्वी दोन बीट मार्शलला देखील या प्रकरणात निलंबित करण्यात आले आहे. तर आतापर्यंत या प्रकरणात सात जणांना अटक करण्यात आली आहे.

पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलिसांची स्वतंत्र मोहीम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केल्याची माहिती केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे.

आपल्या सोशल मीडिया पोस्ट मध्ये मोहोळ म्हणाले , ” ‘त्या’ व्हायरल व्हिडिओ प्रकरणी शिवाजीनगरचे पोलीस निरिक्षक निलंबित…पुण्यातील अमली पदार्थ सेवन करतानाच्या व्हायरल व्हिडिओ प्रकरणी आपल्या सूचनेनंतर मोठी कारवाई करण्यात आली असून ज्या हद्दीतील हा प्रकार आहे त्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे गुन्हे पोलीस निरिक्षक, सहायक पोलीस निरिक्षक यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबनाची कारवाई ही तत्काळची असली तरी पूर्ण पुणे शहरात अमली पदार्थ विरोधात पुणे पोलीसांची स्वतंत्र मोहिम आणि त्यासाठी स्वतंत्र यंत्रणा, मनुष्यबळ नियुक्त करण्याची सूचनाही आयुक्तांना केली आहे.

सर्व महाविद्यालये, पब्स, हॉटेल्स, संशयास्पद ठिकाणं येथे त्वरीत ही शोधमोहिम कडक कारवाईसह करण्यात यावी आणि अंमली पदार्थ पुणे शहरात उपलब्ध होतात कसे? याच्या मुळाशी पोहचण्यासाठी प्रभावी तपास मोहिम सुरू करण्यात यावी, अशाही सूचना दिल्या आहेत ” असे मोहोळ यांनी पोस्ट मध्ये म्हंटले आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Cashback On Gas Cylinder Booking | LPG सिलेंडरच्या बुकिंगवर मिळेल 10 टक्के कॅशबॅक, केवळ घ्यावे लागेल हे क्रेडिट कार्ड

Chandrakant Patil | ‘मी पालकमंत्री असताना अशाप्रकारच्या चिंताजनक घटना घडल्या नाहीत’, चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा रोख कोणाकडे?

Jayant Patil On Pune Drug Case | पुण्याची ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’; सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार असल्याची जयंत पाटलांची टीका

L3 – Liquid Leisure Lounge | फर्ग्युसन रस्त्यावरील ड्रग्स पार्टी प्रकरणात 7 जण अटकेत; पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसह चौघांचे निलंबन