Murlidhar Mohol | भाजपच्या संकल्प पत्राबाबत बोलताना मुरलीधर मोहोळ यांचा विरोधकांवर निशाणा; म्हणाले, “आम्ही दिलेले वचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले”

Murlidhar Mohol | Murlidhar Mohol's explanation on the Chief Minister's post discussion; Said - 'Talking about my name is pointless and farcical'

पुणे : पोलीसनामा ऑनलाईन – Murlidhar Mohol | भाजपच्या पाच वर्षाच्या संकल्पपत्रात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षण क्षेत्र, सामाजिक जीवनमान उंचावण्याचा योजनांचा समावेश आहे. आम्ही दिलेले वाचन पाळतो म्हणून आमचे सरकार पुन्हा आले आहे”, असे वक्तव्य केंद्रीय सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केले आहे. ते पुण्यात माध्यमांशी बोलत होते.

मुरलीधर मोहोळ म्हणाले, ” गेली १० वर्षे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने जाहीरनाम्यातील ३७० कलम, तिहेरी तलाक, राम मंदिर उभारणी केली आहे. मुंबईत कोस्टल रोड, समृद्धी महामार्ग केला आहे. गेल्या अडीच वर्षांत महायुती सरकारने शेतकरी, महिला, तरुणांना स्वावलंबी केले आहे. विकासाच्या दिशेने वेगाने महाराष्ट्र पुढे जात आहे.

आगामी पाच वर्षांचे संकल्पपत्रात पायाभूत सुविधा, आरोग्य, शिक्षणक्षेत्र, सामाजिक जीवनमान उंचविण्याच्या योजनांचा समावेश आहे. भाजपने ८७७ गावांमधून आलेल्या ८ हजार ५३७ सूचनांचा विचार करून संकल्पपत्र तयार केला आहे. लाडकी बहीण योजनेतून वर्षाला २१ हजार, किसान सन्मान योजना १५ हजार वर्षाला मिळणार आहेत. शेतकऱ्यांना मोफत पीकविमा योजनेबरोबर मोफत वीजबिल केले आहे. भाजपने सामान्य जनतेचा विचार केला आहे”, असे मोहोळ यांनी सांगितले.

Total
0
Shares
Related Posts
Satish Wagh Murder Case

Satish Wagh Murder Case | पुणे : आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांच्या पूर्वीच्या भाडेकरुने पाच महिन्यापूर्वी दिली होती सुपारी; पोलिसांच्या तपासात धक्कादायक माहिती आली समोर