Murlidhar Mohol | पैलवान मुरलीधर मोहोळ होणार देशाचे क्रीडामंत्री?

पुणे : Murlidhar Mohol | पुणे लोकसभा मतदार संघातून (Pune Lok Sabha) पहिल्यांदाच निवडून आलेले खासदार मुरलीधर मोहोळ यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मोदींच्या मंत्रिमंडळात मोहोळ यांना स्थान मिळाले आहे. मुरलीधर मोहोळ प्रथमच पुण्यातून खासदार झाले. त्यानंतर त्यांना सरळ मंत्रीपद मिळत आहे. मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांचा पराभव केला होता. महापौर ते केंद्रात मंत्रीपद अशी त्यांची कारकीर्द असणार आहे.

मोहोळ हे स्वतः पैलवान आहेत, कुस्तीसह वेगवेगळ्या खेळांची मोहोळ यांना चांगली माहिती आहे. महाराष्ट्र केसरी स्पर्धा भरवून त्यांनी आपल्यातील खेळाडूची चुणूक दाखवून दिली. चांगले खेळाडू असलेल्या मोहोळ यांना केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री पदी वर्णी लागण्याची शक्यता आहे.

पुण्याचे लोकांमधून निवडून आलेले खासदार सुरेश कलमाडी यांच्याकडे केंद्रीय मंत्रीपद होते. तत्कालीन राज्यसभा सदस्य प्रकाश जावडेकर यांच्याकडेही काही काळ मंत्रीपद होते. मात्र कलमाडी यांच्यानंतर थेट दहा वर्षांनी लोकांमधून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार मुरलीधर मोहोळ यांची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड होत असल्याने पुणेकरांच्या आनंदात मानाचा तुरा रोवला गेला आहे.

पुण्यात दहावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करून मुरलीधर मोहोळ यांनी पुढे कॉलेज आणि कुस्तीसाठी कोल्हापूर गाठले.
कोल्हापुरात तालीम केलेले मोहोळ १९९३ च्या सुमाराला पुण्याच्या राजकीय आराखड्यात उतरले.
पक्ष संघटनेत विविध जबाबदाऱ्या पार पाडत मोहोळ यांनी चार वेळा नगरसेवकपद,
स्थायी समितीचे अध्यक्षपद आणि महापौरपद सांभाळले आहे.
त्यामुळे कसलेला पैलवान ते खासदार असा त्यांचा राजकीय प्रवास सर्वांसाठी प्रेरणादायी ठऱणारा आहे.

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Murlidhar Mohol | मोदींच्या मंत्रिमंडळात मुरलीधर मोहोळ यांना लॉटरी; मोहोळ यांना PMO तून मंत्रिपदासाठी फोन

Modi Cabinet 2024 | मंत्रिमंडळात समावेशासाठी कोणा-कोणाला आले फोन, जाणून घ्या

Ajit Pawar NCP | अजितदादांच्या राष्ट्रवादीला एकही मंत्रिपद नाही? तटकरेंच्या निवासस्थानी बैठकीसाठी फडणवीस तातडीने दाखल

Jayant Patil On BJP | “… भाजपाने पुण्यात समुद्रही आणून दाखवला ” जयंत पाटील यांचा भाजपावर निशाणा