मुरुड-पुणे एसटी बसला रेवतळे घाटात अपघात, २५ प्रावसी जखमी

महाड : पोलीसनामा ऑनलाईन – दापोली तालुक्यातील मुरुड येथून आज सकाळी पुण्याच्या दिशेने निघालेल्या मुरुड-दापोली-पुणे एस.टी बसला रेवतळे घाटात अपघात झाला. या अपघातात २५ प्रवासी जखमी झाले असून जखमींना रायगड जिल्ह्यातील महाड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हा अपघात आज (शनिवार) सकाळी नऊच्या सुमारास झाला. अपघात कशामुळे झाला हे समजू शकले नाही.

अपघात झाला त्यावेळी किती प्रवासी होते हे अद्याप समजू शकले नाही. मात्र, या अपघातात २६ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी प्रवाश्यांपैकी १६ प्रवाश्यांवर प्रथमोपचार करुन घरी सोडण्यात आले. घटनेची माहिती मिळताच एस.टी. महामंडळाचे अधिकारी दाखल झाले. दरम्यान, या मार्गावरुन जाणाऱ्या नागरिकांनी जखमींना अपघातग्रस्त बस मधून सुखरुप बाहेर काढले.

महाड ग्रामीण रुग्णालयात दाखल असलेल्या 16 प्रवाशांमध्ये, अक्षय सुबोध कासारे (23, रा. दावड, ता.मंडणगड-रत्नागिरी), प्रभाकर राजाराम गायकवाड(55, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड-पुणे), उर्मिला लक्ष्मण बटावले (60, रा. मुरुड, ता.दापोली-रत्नागिरी), शिल्पा शरद केळकर (64), हेमलता संतोष मोरे (35, रा. दापोली), सुनंदा मारुता तांबट(71, रा. दाभोळ-रत्नागिरी), मंगेश मारुती तांबट (53, रा, दाभोळ-रत्नागिरी), अंजुम अजीज सय्यद (44, रा.दापोली-रत्नागिरी),अशोक व्यंकटराव पवार (69, रा.सोंडेघर, दापोली), चारंबी खान (75, रा.महाबळेश्वर), फौजीया तनविर कोंडेकर(22, रा. शिरवली-महाड), अशोक तुकाराम येरुणकर (62, रा. शिरसेश्वर, दापोली), मीना चंद्रकांत कुसगांवकर (58, रा. दाभोळ-दापोली), राधिका कृष्णा बेणोरे (62, रा. मुरुड-दापोली), नारायण शंकर पवार (53, रा. मुरुड-दापोली) आणि चंद्रकांत लहू कुसगांवकर (69, रा. दाभोळ -दापोली) यांचा समावेश आहे.