Muscle Contusion (Bruise) | कोणत्याही दुखापतीशिवाय तुमच्याही शरीरावर निळे व्रण पडतात का?, मग असू शकतो ‘या’ आजाराचा संकेत

पोलीसनामा ऑनलाइन टीम – कधीकधी असे होते की शरीराच्या एखाद्या भागात वेदना (Pain) जाणवते. जेव्हा तुम्ही तो भाग पाहता तेव्हा तुम्हाला निळ्या रंगाची खूण दिसते, जी पाहून तुम्ही विचार करत असता की ही दुखापत कधी झाली, पण तुम्हाला आठवत नाही. परंतु शरीरावर दिसणारे हे निळे ठिपके (Muscle Contusion (Bruise)) तुमच्या आरोग्याविषयी खूप काही सांगून जातात. अशाच काही गंभीर समस्यांबद्दल जाणून घेऊया (Muscle Contusion (Bruise)).

 

जेव्हा शरीरावर अंतर्गत दुखापत होते, तेव्हा अनेकदा त्वचेवर निळ्या रंगाची खूण दिसून येते. वैद्यकीय भाषेत त्याला कंट्युशन किंवा अंतर्गत दुखापत म्हणतात (Muscle Contusion (Bruise)).

 

सामान्यत: शरीरावर झालेल्या दुखापतीमुळे रक्तवाहिन्यांना (Blood Vessels) दुखापत होते, त्यामुळे तेथे निळ्या रंगाची खूण दिसते. हे घडते कारण दुखापत झाल्याने निघालेले रक्त पेशींमध्ये (Blood Cells) पसरते. हा निळा व्रण इतरही अनेक कारणामुळे दिसू शकतो, वाढते वय, पोषणाची कमतरता, हिमोफिलिया आणि कर्करोग (Growing Old, Nutritional Deficiency, Hemophilia And Cancer) यांसारख्या गंभीर आजारांच्या परिणामांमुळे असे होऊ शकते.

का पडतात निळे व्रण (Why Do These Marks) –

1. पोषक तत्वांच्या कमतरतेमुळे (Due To Lack Of Nutrients) –
रक्ताच्या गुठळ्या आणि जखमा बरे करण्यात काही जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे (Minerals) महत्त्वाची भूमिका बजावतात. अन्नमध्ये व्हिटॅमिन के, सी आणि मिनरल्सच्या (Vitamin K, C, Minerals) कमतरतेमुळे शरीरावर निळे डाग दिसू लागतात. व्हिटॅमिन के रक्त गोठण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, व्हिटॅमिन सी त्वचा आणि मज्जातंतूंच्या अंतर्गत जखमांपासून संरक्षण करते.

 

2. वृध्दापकाळ (Old Age) –
अनेकदा वयानुसार, व्यक्तीच्या शरीरातील रक्तवाहिन्या सूर्यप्रकाशाचा सहज सामना करू शकत नाहीत. त्यामुळे शरीरावर निळे डाग दिसतात.

 

3. अशक्तपणा (Weakness) –
कोणतीही दुखापत भरून काढण्यासाठी शरीरात आयर्न (Iron) आणि झिंक (Zinc) आवश्यक असते. शरीरात लोहाच्या कमतरतेमुळेही शरीर निळे पडते.

 

4. रक्त पातळ करणारी औषधे (Blood Thinner Medicine) –
एस्पिरिन (Aspirin) सारखी रक्त पातळ करणारी औषधे असल्यास निळे व्रण पडण्याची समस्या असू शकते. जर या लक्षणाने त्रास होत असेल, तर औषधे बदलण्यासाठी डॉक्टरांशी बोलू शकता.

 

 

फक्त आणि फक्त आरोग्याच्या (हेल्थ) बातम्यांसाठी ज्वाईन करा आमचा स्पेशल टेलिग्राम ग्रुप, फक्त क्लिक करा

 

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Muscle Contusion (Bruise) | blue marks on your body could be the sign of these problems

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Reason For Belly Fat Gain | चरबी का वाढते? तज्ज्ञांनी शोधलं याचं कारण, जाणून घ्या कशी करावी सुटका

 

Late Night Sleeping Side Effects | सावधान ! रात्री उशिरा झोपण्याच्या सवयीमुळे आरोग्यावर होऊ शकतो गंभीर परिणाम; जाणून घ्या

 

Skin Cancer Prevention | ‘या’ 3 गोष्टींची काळजी घेतल्यास त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होऊ शकतो; जाणून घ्या