Muscles Pain Cure | स्नायूंच्या दुखण्याने त्रस्त असाल तर ‘या’ 5 उपायांनी करा उपचार; जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाइन टीम – आपला निष्काळजीपणा इतका वाढला आहे की आपण शरीरात उद्भवणार्‍या अनेक समस्यांवर उपचार करण्यासाठी डॉक्टरकडे जात नाही, तर त्याकडे दुर्लक्ष करतो. स्नायू दुखणे ही एक समस्या आहे ज्यामुळे स्नायूंमध्ये तणाव किंवा वेदना (Muscles Pain Cure) होण्याची तक्रार असते. स्नायूंच्या क्षमतेपेक्षा जास्त काम केल्यामुळे स्नायू दुखण्याची समस्या (Muscles Pain Cure) होते.

 

स्नायू दुखणे (Muscle Pain) ही एक सामान्य समस्या आहे जी शरीराच्या कोणत्याही भागात होऊ शकते. अनेकवेळा स्नायूंना आराम मिळाल्यावर ही समस्या स्वतःच बरी होते. जेव्हा स्नायूंचा त्रास सहन होत नाही तेव्हा समस्या जास्त वाढते. हा स्नायूंचा ताण अनेकदा मान (Neck), कंबर (Waist), खांदे (Shoulder) आणि गुडघ्याच्या मागच्या स्नायूंमध्ये (Back Muscles Of Knee) होतो.

 

या त्रासाचे कारण रक्तपुरवठा न होणे (No Blood Supply), स्नायूंवर दाब पडणे (Muscle Pressure) आणि पोटॅशियम (Potassium), कॅल्शियम (Calcium) आणि मॅग्नेशियम (Magnesium) यांसारख्या महत्त्वाच्या खनिजांच्या आहारातील अत्यंत कमी सेवनामुळे देखील स्नायूत पेटके आणि वेदना (Muscles Pain Cure) होऊ शकतात.

 

तुम्हालाही तुमच्या शरीराच्या स्नायूंमध्ये कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत असेल तर काळजी करू नका,
तर घरीच त्यावर प्रभावी उपचार करा. स्नायूंच्या दुखण्यावर घरी कसे उपचार करावे ते जाणून घेऊया (How To Treat Muscle Pain At Home).

 

1. मेहनतीचे काम कमी करा (Reduce Hard Work) :
स्नायूंमध्ये ताण किंवा दुखण्याची तक्रार असल्यास, स्नायूंना आराम देण्यासाठी जास्त मेहनत करणे कमी करावे.
दोन तास काम केल्यानंतर थोडी विश्रांती घ्या.

2. बर्फाने शेकवा (Ice Pack Compress) :
शरीराच्या ज्या भागात दुखण्याची तक्रार आहे तो भाग आईस पॅकने 15 मिनिटे शेकवा. टॉवेलमध्ये बर्फ गुंडाळून शेकू शकता.

 

3. आल्याची पेस्ट दुखणार्‍या भागावर लावा (Ginger Patch Pain Relief) :
स्नायू दुखण्याच्या समस्येवर आले (Ginger) वापरा. आल्याचा रस (Ginger Juice) तेलात मिसळून पेस्ट बनवा
आणि दुखणार्‍या भागावर लावा, दुखण्यापासून आराम मिळेल.

 

4. डाएटमध्ये प्रोटीनचा करा समावेश (Include Protein In Diet) :
स्नायू दुख्रण्याची समस्या दूर करण्यासाठी, प्रोटीनयुक्त अन्नाचा आहारात समावेश करा.
अंडी (Egg), चिकन (Chicken), मासे (Fish), स्प्राउट्स (Sprouts) आणि कडधान्यांचा (Grain) आहारात समावेश करा.

 

5. जास्त पाणी प्या (Drink Plenty Of Water) :
पाण्याच्या कमतरतेमुळे स्नायू जखडणे आणि वेदना होऊ शकतात. पाणी शरीराला डिटॉक्स (Detox) करते,
त्यामुळे थोड्या-थोड्या वेळाने पाण्याचे सेवन करणे गरजेचे आहे.
दिवसभरात 3 लिटर पाणी पिणे आवश्यक आहे, यापेक्षा कमी पाणी पिणे शरीराला हानी ठरते.

 

(Disclaimer : वरील लेखामध्ये सांगितलेले विधी, पध्दती आणि दाव्यांचं आम्ही कुठलंही समर्थन करत नाही. त्यांना केवळ सल्ला म्हणून घ्यावं.
अशा पध्दतीच्या कोणत्याही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)

 

Web Title :- Muscles Pain Cure | if you want to get rid of muscle pain so you should follow these home remedies

 

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

 

हे देखील वाचा

 

Fatty Liver | वाढत्या वजनाचे कारण असू शकते लिव्हरसंबंधी समस्या, जाणून घ्या लक्षणे आणि बचावाची पद्धत

 

Mallika Sherawat Bold Bikini Photos | बोल्ड सीनमध्ये मर्यादा पार करणाऱ्या ‘या’ अभिनेत्रीनं शेअर केले असे काही फोटो, सोशल मीडियावर उडाली खळबळ

 

Gallbladder Stone | गॉलब्लॅडर स्टोनकडे दुर्लक्ष करू नका, घरगुती उपचाराने करू शकता ठिक; जाणून घ्या

 

Gold-Silver Price Today | ‘सोने-चांदी’चे दर वधारले, सोने पुन्हा 51 हजारांवर तर चांदी 1 हजारांनी महाग, जाणून घ्या तुमच्या शहरातील भाव