home page top 1

वाजपेयी सरकारच्या काळात सुटलेला ‘हा’ दहशतवादी अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जम्मू काश्मीरमधील अनंतनाग येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. या हल्यात मुश्ताक अहमद जरगर याचा सहभाग असल्याचं आता समोर येत आहे. जरगर हा जैश-ए-मोहम्मद आणि अल-उमर-मुजाहिदीन यांच्यात समन्वयाचे काम करत असल्याची माहिती मिळत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या दहशतवादी हल्ल्यामध्ये मुश्ताक अहमदची महत्वाची भूमिका होती. त्यामुळे त्याने पुन्हा एकदा डोके वर काढल्याची चर्चा होत आहे.

भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार त्याचे नेटवर्क काश्मीरमध्ये जवळपास शून्य आहे, त्यामुळे या हल्ल्यासाठी त्याला पाकिस्तानमधून मदत करण्यात आल्याची शक्यता नाकारता येत नाही. या हल्ल्यासाठी त्याने जैश आणि हिजबुल या दहशतवादी संघटनाची मदत घेतली असण्याची शक्यता देखील त्यांनी वर्तवली. अटलबिहारी यांच्या कार्यकाळात २४ डिसेंबर १९९९ रोजी दहशतवाद्यांनी भारतीय विमानाचं अपहरण केलं होतं.त्यात एकूण १७९ प्रवासी आणि १५ हवाई कर्मचारी होते. त्यावेळी दहशतवाद्यांनी प्रवाशांच्या सुटकेसाठी ३५ दहशतवाद्यांची सुटका तसेच २०० मिलियन अमेरिकी डॉलर्सची मागणी केली होती. त्यानंतर ३ दहशतवाद्यांच्या सुटकेस भारत तयार झाला होता. त्यानंतर परराष्ट्र मंत्री जसवंत सिन्हा स्वत: मसूद अजहर, अहमद जरगर, शेख अहमद उमर सईद यांना घेऊन प्रवाशांची सुटका करण्यासाठी गेले होते.

दरम्यान, भारतीय गुप्तचर यंत्रणांना संशय आहे कि, बाळकोट येथील ट्रेनिंग कॅम्पमध्ये देखील त्याचा समावेश असल्याची असल्याची शक्यता वर्तवली आहे.

सिने जगत –

…म्हणून ‘तिने’ अनुपम खैरला ‘kiss’ करण्यास दिला होता नकार

ऋतिक रोशन ‘या’ अभिनेत्रीचा मोठा ‘फॅन’

आमिर खानची मुलगी इरा खानने केला ‘डेटींग’बाबत मोठा ‘गौप्यस्फोट’ !
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंसोबतच्या नात्याबद्दल दिशा पटानीने केला मोठा खुलासा

Loading...
You might also like