×
HomeशहरअकोलाMushtaq Ali T20 | विदर्भ क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी अकोल्याच्या अथर्व तायडेची निवड

Mushtaq Ali T20 | विदर्भ क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी अकोल्याच्या अथर्व तायडेची निवड

अकोला : पोलीसनामा ऑनलाईन – Mushtaq Ali T20 | बीसीसीआय (BCCI) अंतर्गत येत असलेल्या सैय्यद मुश्तक अली टी-20 (Syed Mushtaq Ali T-20) क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भ क्रिकेट संघ (Vidarbha Cricket Team) जाहीर करण्यात आला आहे. या विदर्भ क्रिकेट संघाच्या उपकर्णधारपदी अकोल्याचा क्रिकेटपटू अर्थव तायडेची (Atharv Tayde) याची निवड करण्यात आली आहे. विदर्भ क्रिकेट स्पर्धेमध्ये अकोला क्रिकेट क्लबच्या अर्थव तायडे व दर्शन नळकांडे (Darshan Nalkande) या दोन खेळाडूंना विदर्भ क्रिकेट संघामध्ये स्थान मिळाले आहे.

 

सैय्यद मुश्तक अली टी-20 स्पर्धा ही राजकोट (Rajkot) या ठिकाणी 11 ते 22 ऑक्टोबर 2022 दरम्यान होणार आहे. या स्पर्धेत विदर्भाचा संघ ग्रुप ‘ए’मध्ये असून, त्याचा सामना ग्रुपमधील राजस्थान, मध्य प्रदेश, मुंबई, आसाम, रेल्वे, उत्तराखंड, मिझोराम या संघासोबत होणार आहे. या स्पर्धेसाठी अकोला क्रिकेट क्लबच्या दोन खेळाडूंची निवड झाल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. क्रिकेट क्लबच्या दोन खेळाडूंची मुश्ताक अली टी- 20 स्पर्धेसाठी निवड होणे हि अकोला जिल्ह्यासाठी मोठी अभिमानाची गोष्ट आहे.

 

Web Title :- Mushtaq Ali T20 | mushtaq ali t20 tournament akola atharva taide as vidarbha cricket team vice captain

Join our WhatsApp GroupTelegramfacebook page and Twitter for every update

हे देखील वाचा

Stay Connected
534,500FansLike
125,687FollowersFollow
61,453SubscribersSubscribe
Must Read
Related News