‘सिंगर’ अरमान मलिकनं डिलीट केल्या सगळ्याच Insta च्या पोस्ट, म्हणाला – ‘आता आणखी सहन नाही करू शकत’

पोलीसनामा ऑनलाइन  – फेमस सिंगर अरमान मलिक यानं आपल्या साऱ्या इंस्टा पोस्ट डिलीट करत चाहत्यांना चकित केलं आहे. काही वेळापूर्वीच अरमान मलिकनं इंस्टा पोस्ट डिलीट करत प्रोफाईल फोटोही काळा केला आहे. एख फोटो शेअर करत अरमान म्हणाला आहे की, “मी आता आणखी जास्त सहन करू शकत नाही.” अरमानच्या या पोस्टनंतर अनेकांनी कमेंट करत त्याला प्रश्न विचारले आहेत. अखेर असं काय झालं आहे की, अरमाननं हे पाऊल टाकलं. अनेक सवाल उपस्थित होत असताना अरमाननं अद्याप याबाबत काहीही खुलासा केलेला नाही.

अरमान मलिकनं आपल्या शाळेच्या दिवसांची आठवण काढत म्हटलं की, “क्लासमध्ये त्रास झाल्यानंतर मला आयुष्यात भीतीची जाणीव झाली. अरमाननं एक ट्विट केलं आहे ज्यात त्यानं लिहिलं की, वेळ सगळे खुलासे करतो. परेशान होऊ नका.”

एकीकडे त्यानं इंस्टा पोस्ट डिलीट केल्या तर दुसरीकडे अरमाननं ट्विटरवर 1 मिलियन्स फॉलोवर्स झाल्यानं चाहत्यांना धन्यवादही दिले आहेत. एक सेल्फी शेअर करत त्यानं लिहिलं की, “अखेर ट्विटरवर 1 मिलियन….. पुढे आणि मागच्या बाजूला कोणी दिसत नाही… जाऊ द्या.” ट्विटरव्यतिरीक्त अरमानच्या फेसबुकवरही सारं काही आलबेल आहे.