‘गायक’ विशाल ददलानी रोज ओढायचा 40 सिगारेट, ‘स्मोकिंग’ सोडल्यावर आता म्हणतो… (व्हिडीओ)

मुंबई : पोलीसनामा ऑनलाईन – आज जगभरात स्मोकिंग करणारे खूप आहेत. बॉलिवूड कलाकारही त्याला अपवाद नाहीत. काही असेही कलाकार आहेत ज्यांनी आपल्या विल पावरच्या मदतीनं स्मोकिंग सोडली आहे. असाच एक स्टार आहे बॉलिवूडचा टॉप म्युझिक कंपोजर विशाल ददलानी. विशालनं इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर करत आपल्या स्मोकिंगच्या जर्नीबद्दल सांगितलं आहे.

गेल्या 6 महिन्यांपासून सोडली आहे स्मोकिंग
विशालनं इंस्टावरून एक व्हिडीओ शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्यानं म्हटलं आहे की, “मी ऑगस्ट 2019 च्या शेवटच्या दिवशी स्मोकिंग सोडली. सलग 9 वर्षे मी रोज 40 सिगारेट पित होतो. माझ्या आवाजानं माझी साथच सोडली होती.”

विशाल म्हणाला, “मी कोणाला सांगितलं नाही परंतु हे खरं आहे की, स्ट्रगल करत होतो. माझी रेंज, कंट्रोल, टोन सर्वकाही बिघडलं होतं. सॉफ्ट पद्धतीनं गाणं माझ्यसााठी अशक्य होत होतं. सॉफ्ट गाणं लाऊडपेक्षाही हार्ड असतं. गेल्या 2 वर्षांपासून तुम्ही जे गाणं ऐकताय ते मी ओरिजनली साऊंड करतो तसं अजिबात नाही.”

पुढे बोलताना विशाल म्हणाला, “जवळपास 6 महिन्यांनंतर मी स्मोकिंग पूर्णपणे सोडली आहे. माझा आवाज जणू परत आला आहे असं मला वाटत आहे. माझा क्लीन टोन परत आला आहे. माझा कंट्रोल आता चांगला झाला आहे. आधी गाताना मला त्रास व्हायचा अस्वस्थ वाटायचं. आता मला गाताना आनंद होत असतो. मला हे सांगायचं आहे की, जर तुम्हीही स्मोकिंग करत असाल तर हे तुम्हाला पूर्णपणे डॅमेज करेल. त्याआधीच तुम्ही स्मोकिंग सोडा.”