‘चंद्रयात्रेचा जश्न’ मध्ये ‘संगीत’ सादरीकरण करून सांगितली चंद्रयानची ‘स्टोरी’ !

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) भारताच्या चंद्र मिशन ‘चंद्रयान’ आणि त्यासंबंधित जोडल्या गेलेल्या प्रतिष्ठित वैज्ञानिकांच्या सम्मानासाठी एका संगीत कार्यक्रमाचे आयोजन करणार आहे. या कार्यक्रमाला ‘चंद्रयान भारताच्या चंद्रयात्रेचा जश्न’ असे नाव देण्यात आलेली आहे. यामध्ये चंद्रयानाच्या उड्डाण ते पोहचेपर्यंतच्या इसरोच्या प्रवासाचा वृत्तांत असणार आहे.

चंद्रयान हे भारताचे प्रख्यात शास्त्रज्ञ आणि चांदमिशनला आमच्याकडून ही एक भेट आहे, असे एनसीपीए मधील भारतीय संगीत प्रमुख सुवर्णलता राव यांनी सांगितले. कार्यक्रमात राकेश चौरसिया (बासरी गायन) यांच्यासोबत शांतनु मोइत्रा, जयंती कुमारेश (वीणा), अंबी सुब्रमण्यम (व्हायोलिन), ओजस अढिया (तबला) आणि श्रीधर पार्थसार्थी (मृदंगम), कौशिकी चक्रवर्ती (गायन) हे देखील असणार आहेत.

काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या आलेल्या मिशन चंद्रयानचा प्रवास देशातील प्रत्येकासाठी स्मरणीय होता या प्रवासाचा संगीत कार्यक्रमाद्वारे वृत्तात सादर केला जाणार आहे. त्यामुळे यामधील अनेक छोटे मोठी पैलू तसेच यावर काम केलेल्या शास्त्रज्ञांची मेहनत यातून दिसून येणार आहे.

 

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/