टरबूज, जवस आणि खरबुजाच्या बियांशिवाय तुमचा ‘डायट प्लॅन’ आहे अपूर्ण, त्यांचे फायदे आणि वापर कसा करावा याबाबत जाणून घ्या

पोलीसनामा ऑनलाईन : बर्‍याचदा लोक छोटी-छोटी भूक भागविण्यासाठी अनहेल्दी स्नॅक्स जसे की समोसे, भजे, पॅकेट फूड इत्यादींची निवड करतात. अशा परिस्थितीत त्यांना आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. म्हणूनच आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी आज आपण अशी काही सीड्सबद्दल जाणून घेणार आहोत ज्यातून आपण टेस्टी आणि हेल्दी फ्राइड स्नॅक्स बनवू शकता आणि हलकी भूक लागली असता त्यास खाऊ शकता. एवढेच नाही तर त्या सीड्सपासून होणाऱ्या आणखी अनेक फायद्यांविषयीही जाणून घेऊया.

फ्राइड स्नॅक्स केवळ चवीलाच नव्हे तर आरोग्यासाठी देखील चांगले असतात. आपण अशा फ्राइड स्नॅक्सबद्दल बोलत आहोत जे बियांपासून बनविलेले असतात. ‘सीड्स मेड फ्राइड स्नॅक्स’ हेल्दी तसेच चवदार असतात. म्हणूनच लंच आणि डिनरच्या दरम्यान जर आपल्याला भूक लागली असेल तर समोसा किंवा भजे खाण्यापेक्षा काही तळलेले स्नॅक्स खाणे चांगले असते. आपल्या मनात असे प्रश्न उद्भवू शकतात की सीड्सपासून कसे बरं टेस्टी फ्राइड स्नॅक्स तयार करता येतील? सीड्स खाण्याने काय फायदा होतो? सीड्सपासून फ्राइड स्नॅक्स कसे बनवायचे? तर येथे आज आम्ही या सर्व प्रश्नांची उत्तरे देणार आहोत. चला जाणून घेऊया…

1. खरबुजाच्या बिया

उन्हाळ्यात खरबूज खाण्यामुळे पाण्याची कमतरता भरून निघते. हे केवळ शरीराला ऊर्जा देत नाही तर त्याच्या बिया आरोग्यासाठीही फायदेशीर असतात. खरबुजाच्या बिया ड्रायफ्रूट्स म्हणून देखील वापरल्या जातात. मिठाई असो किंवा हलवा, वरून खरबुजाच्या बिया टाकून आपण त्यास अधिक हेल्दी बनवू शकतो. खरबुजाच्या बियांमध्ये ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड आढळते, हे हृदयाशी संबंधित आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करते. या व्यतिरिक्त व्हिटॅमिन सी देखील त्यात आढळते.

कसा वापर करावा

खरबुजाच्या बिया एका चाळणीत धुवून घ्या. त्यांना वेळोवेळी सूर्यप्रकाश दाखवा जेणेकरून त्यांच्यामध्ये ओलावा राहणार नाही. बिया तयार झाल्यावर आपण त्यांचा वापर भाज्या, ग्रेव्ही, शेक, मिठाई, स्नॅक्स म्हणून करू शकता.

2. बीन सीड्स

जेव्हा हलके फुलके खाण्याची इच्छा होत असेल तेव्हा बीन सीड्स ही चांगली निवड असते. ते चवीने खारट असतात. बर्‍याच ठिकाणी बाजारांमध्ये बीन सीड्सला स्नॅक्स म्हणून विकत घेतले जाते. आपण त्यांना घरात देखील सहजपणे साफ करून स्नॅक्स म्हणून घेऊ शकता.

– कसा वापर करावा

प्रथम बीनच्या शेंगांपासून बिया वेगळ्या करा आणि त्यांना कडक उन्हात ठेवा. एकदा त्यांच्यातील ओलावा संपला की आपण त्यांना स्नॅक्स म्हणून खाऊ शकता.

3. जवसाच्या बिया

जवसाच्या बियांना फ्लॅक्स सीड्स देखील म्हणतात. हे एक सुपरफूड असल्याने डॉक्टरांनीही त्यास आहारात समाविष्ट करण्याची शिफारस केली आहे. त्यामध्ये व्हिटॅमिन बी, कॅल्शियम, मॅग्नेशियम, तांबे, लोह, जस्त, पोटॅशियम इत्यादी खनिजे असतात. या बिया बद्धकोष्ठता, अ‍ॅसिडिटी, डायबिटीज, संधिवात, कर्करोग तसेच हृदयाच्या अनेक समस्यांपासून मुक्त होण्यास मदत करतात.

– कसा वापर करावा

जवसाच्या बिया बाजारात सहज उपलब्ध होतात. आपल्याला फक्त जवसाच्या बियांचे एक पॅकेट घरात आणायचे आहे आणि रोज सकाळी त्या बियांना रिकाम्या पोटी पाण्यासोबत खायचे आहे.

4. टरबुजाच्या बिया

टरबुजाच्या बियांचा वापर अनोखे फ्लेवर आणि पोषक तत्वांसाठी केला जातो. या बियांचा वापर मुघलईच्या अन्नात बर्‍याच काळापासून चालू आहे. याशिवाय टरबुजाच्या बियांची पेस्ट ग्रेव्हीला घट्ट करण्यासाठी वापरली जाते. सणांमध्ये देखील या बियांचा वापर पोषक तत्वांची कमतरता पूर्ण करण्यासाठी केला जातो. होळीमध्ये जर भांग बनवायचा असेल तर त्याच्या वरून टाकण्यासाठी यांचा वापर केला जातो. याशिवाय या बिया चूर्ण स्वरूपात दुधात मिसळून गर्भवती महिलांना दिल्या जातात. तसेच, जर तुम्हाला एखादी नवीन चव हवी असेल तर ब्रेडच्या वर भाजलेल्या बिया टाकून खाऊ शकता.

– कसा वापर करावा

टरबूज मधून काढलेल्या बिया एका चाळणीत ठेवा आणि धुतल्यानंतर उन्हात वाळवा. बिया वाळल्यावर सोलून घ्या आणि त्यातील बिया काढून त्या वापरा.

You might also like