खळबळजनक ! मुलीसाठी ‘त्यानं’ बदललं नाव, मंदिरातही गेला अन् बलात्काराचा व्हिडीओ बनवुन केलं ‘ब्लॅकमेल’

नवी दिल्ली : वृत्तसंस्था – उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारच्या काळात लव जिहादची अनेक प्रकरणे समोर आली असून बरेलीमध्ये देखील अशाच प्रकारची एक घटना समोर आली आहे. येथील एका मुस्लिम मुलाने आपले नाव बदलून एका दलित अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून बलात्कार आणि फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. इतकेच नाही तर या बलात्काराचा व्हिडीओ बनवून त्या मुलीला ब्लॅकमेल देखील केले.

१४ वर्षीय पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, ती एका ब्युटी पार्लरमध्ये काम करत असून दररोज रिक्षाने प्रवास करते. या वेळी प्रवासात तिची ओळख एका मुलाशी झाली.त्याने त्याचे नाव अमन असे सांगितले. त्यानंतर त्याने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिची फसवणूक केली. आपण मुस्लिम असल्याचे ओळखू येऊ नये म्हणून त्याने हातामध्ये कडे घातले होते.त्याचबरोबर एकदा तो पिडीतेबरोबर मंदिरात देखील गेला होता. त्याचदरम्यान त्याने अनेक वेळा पीडितेवर बलात्कार केला आणि त्याचा व्हिडीओ बनवला. त्यानंतर एक दिवस तिला त्याचे नाव अमन नसून खालिद असल्याचे समजले. त्यानंतर तिने त्याच्याशी भेटणे बंद केल्यानंतर त्याने व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. सध्या पीडितेच्या आईने या घटनेविषयी बोलताना सांगितले कि, त्याने माझ्या मुलीचे आयुष्य बरबाद केले असून त्याला लवकरात लवकर अटक करावी.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच हिंदू संघटना या पीडित मुलीला घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचल्या. त्यानंतर गुन्हा दाखल करून घेण्यावरून पोलीस आणि नेत्यांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांनी पीडितेच्या जबाबावरून गुन्हा दाखल करून घेत आरोपीविरुद्ध ३७६, ३६३, ३२३ आणि अ‍ॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

आरोग्यविषयक वृत्त

पोलीसनामा न्युज आता टेलीग्रामवर... आमचं चॅनेल (@policenamanews) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
WhatsAPP
You might also like