राम मंदिरासाठी मुस्लीम उद्योजकानं दान केली ‘इतकी’ रक्कम, स्वयंसेवकांना आश्चर्याचा धक्का

चेन्नई: पोलिसनामा ऑनलाईन – अयोध्येत उभारण्यात येणाऱ्या भव्य राम मंदिरासाठी संपूर्ण देशातून निधी गोळा करण्यात येत आहे. आपल्याला जमेल तेवढा निधी लोक दान करत आहे. स्वयंसेवकांच्या माध्यमातून निधी गोळा करण्यात येत आहे. दरम्यान तामिळनाडूतील एका मुस्लिम उद्योजकांकडे ज्यावेळी हे स्वयंसेवक गेले त्यावेळी या उद्योजकाने राम मंदिरासाठी एक लाख रुपयांचा चेक दिला. त्यांनी दिलेली ही रक्कम पाहून स्वयंसेवकांनाही आश्चर्याचा धक्का बसला. हबीब असं या उद्योजकाचे नाव आहे.

राम मंदिराच्या उभारणीसाठी लागणाऱ्या निधीला जमेल त्याप्रमाणे लोक आपलाही हातभार लागावा यासाठी प्रयत्न करत आहेत. दान करणाऱ्यांमध्ये रोजंदारीवरील मजूर, छोटे व्यापारी यांच्यासारखे लोकही सहभागी आहेत.

राममंदिरासाठी एक लाख दान केल्यानंतर हबीब म्हणाले, चांगल्या कामासाठी मदत करण्यात काही चुकीचं नाही. आपण सर्व ईश्वराची मुलं आहोत. याच विश्वासासोबत मी ही रक्कम दान केली आहे. मुस्लीम आणि हिंदूंमध्ये जातीय सलोखा वाढवण्याचा माझा प्रयत्न आहे. असं हबीब यांनी सांगितलं आहे. काही लोक मुस्लिमांना हिंदू आणि देशविरोधी म्हणतात हे पाहून दुख: होतं अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.