पुणे : CAA आणि NRC विरोधात मुस्लिम समाजाचा मोर्चा, हजारो नागरिकांचा सहभाग !

पुणे : पोलीसनामा ऑनलाइन – नागरिकत्व सुधारणा विधेयक आणि नॅशनल रजिस्टर ऑफ सिटिझन्सला देशभरात विरोध होताना दिसत आहे. आज मुस्लिम समाजाकडूनही पुण्यात मोर्चा काढण्यात आला होता. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चात हजारो मुस्लिम नागरिकांनी सहभाग नोंदवला होता. यावेळी विविध धर्मांच्या धर्मगुरुंनी उपस्थितांना संबोधितही केलं.

यावेळी या मोर्चात सहभागी अनेक लोकांच्या हातात फलक दिसले. हिंदुस्थान में हम किराएदार नहीं बराबर के हिस्सेदार है !, सेव्ह कॉन्स्टिट्युशन रिजेक्ट कॅब असा मजकूरही या फलकांवर दिसत होता. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसला. यावेळी मोर्चात भारताचा झेंडाही दिसला होता.
Pune
कॅम्प भागातील बाबाजान दर्ग्यापासून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. कॅम्प भागातील आंबेडकर पुतळ्यापासून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला होता. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा सभेत रुपांतरीत झाला. कार्यालयासमोरील रस्ता यावेळी बंद करण्यात आला होता. यावेळी मुसलमान कुठल्याही कायद्याला घाबरत नाहीत. मुसलमान कागदी भारतीय नाहीत तर खरे हिंदुस्थानी आहेत. संविधानाच्या विरोधात जाणाऱ्यांच्या विरोधात लढू अशा भावनाही यावेळी व्यक्त करण्यात आल्या.

Pune

हिंदुस्थान जिंदाबाद अशा घोषणाही यावेळी देण्यात आल्या. दरम्यान मोर्चाच्या आयोजकांच्या शिष्टमंडळानं यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना आपल्या मागण्यांचं निवेदन दिलं.

फेसबुक पेज लाईक करा – https://www.facebook.com/policenama/